Sports Complex in Nagpur : १०० कोटी खर्चून नागपुरात होणार अद्ययावत क्रीडा संकुल !

CM Devendra Fadnavis’ Commitment and Chandrashekhar Bawankule’s Persistent Follow-up : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कटीबद्धता अन् चंद्रशेखर बावनकुळेंचा पाठपुरावा

Nagpur : पुण्याच्या बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या धर्तीवर नागपुरातील विभागीय क्रीडा संकुलाला अद्ययावतीकरण व नुतनीकरण करून त्यास राज्यस्तरीय क्रीडा संकुलाचा दर्जा देण्यात आलेला आहे. विदर्भातील खेळाडुंना क्रीडा कौशल्यात अधिक निपुणता यावी आणि येथून आंतरराष्ट्रीय क्रीडापटू घडावे, या उद्देशाने मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात सुविधा विकसीत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे क्रीडा संकुलाकरिता मंजूर झालेला निधी वितरित करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मानकापूर येथील क्रीडा संकुलाला काही महिन्यांपूर्वी प्रत्यक्ष भेट देऊन विकास कामांबाबत आढावा घेतला होता. नागपूर महानगरात प्रत्येक प्रभागात व्यापक प्रमाणात उपलब्ध जागेप्रमाणे क्रीडा सुविधा देण्याचे निर्देश त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिले आहेत.

OBCs’ Battle for Their Rights : तुमचे अर्थमंत्री आमच्याशी असे का वागतात ?

नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विभागीय क्रीडा संकुलाच्या कामांना गती देण्यासाठी विशेष पाठपुरावा करून हा १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला आहे. मानकापूर क्रीडा संकुलाच्या सुधारित अंदाजपत्रकात अंतर्भूत असलेल्या विविध कामांपैकी इमारत बांधकामे व क्रीडा सुविधांच्या प्रस्तावाला उच्चस्तरीय सचिव समितीच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. ७४६.९९ कोटी रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

controversy : कबूतरांसाठी धर्मसभा; जैन मुनींच्या वक्तव्यावर राजकीय वाद !

या क्रीडा संकुलाच्या अद्ययावतीकरण व नुतनीकरणात स्वीमींग पूल, स्क्वॅश कोर्ट, टेनिस कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट, आर्चरी रेंज, हॉकी, फुटबॉल पॅव्हेलियन या खेळांच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उभारण्यात येणार आहेत.