ShivSena’s Chakkajam protest against fare hike : एसटी भाडेवाढ मागे घ्यायला सरकारला भाग पाडण्याचा निर्धार
Buldhana राज्यात नुकत्याच निवडणुका झाल्या. सत्ताधारी पक्षाने निवडणूक काळात दिलेली आश्वासने अजून पूर्ण केलेली नाही. दुसरीकडे सामान्य लोकांवर बोजा वाढवण्याचा निर्णय घेत एसटी दरवाढ करण्यात आली. ही दरवाढ दुर्दैवी आहे. हा दरवाढीचा निर्णय मागे घेण्यासाठी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे आंदोलन आहे. एसटी भाडेवाढ राज्यातील फडणवीस सरकारला मागे घेण्यास भाग पाडू, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी दिला आहे.
गोरगरिबांना प्रवासात साथ देणाऱ्या लालपरीच्या भाडेवाढीचा निर्णय सरकारने घेतला. एसटी महामंडळाने १५% दरवाढ केली. या दरवाढी विरोधात बुलडाणा जिल्हा शिवसेनेतर्फे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संगम चौक व एसटी डेपो बुलडाणा येथे आंदोलन केले. जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात निदर्शने करून चक्का जाम आंदोलन करण्यात आले. झालेली दरवाढ ही सामान्य जनतेवर केलेला अन्याय असून या दरवाढीचा निर्णय मागे घ्यावा. अन्यथा येणाऱ्या काळात शिवसेनेतर्फे जिल्ह्यात मोठ्या स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
Nagpur district congress: निलंबित राजेंद्र मुळक काँग्रेसच्या बैठकीत
यावेळी जिल्हा संघटक प्रा. डी एस लहाने सर, ॲड. सुमित सरदार, उपजिल्हा प्रमुख सुनील घाटे, तालुका प्रमुख लखन गाडेकर, विजय इंगळे, युवासेना जिल्हा प्रमुख नंदु कऱ्हाडे, उप जिल्हा प्रमुख डॉ अरुण पोफळे, किसान सेनेचे उप जिल्हा प्रमुख अशोक गव्हाणे, गणेश सोनूने, की से तालुका प्रमुख गजानन उबरहंडे, दलीत आघाडीचे बबन खरे, उप तालुका प्रमुख विजय इतवारे, एकनाथ कोरडे, किशोर कानडजे, मोहम्मद सोफियान, राजु बोरसे, अनिकेत गवळी, माजी सभापती सुधाकर आघाव, समाधान बुधवत आदींची उपस्थिती होती.
Jaykumar Rawal : मलेशियासोबत सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध वृद्धींगत करण्यात महाराष्ट्राचा पुढाकार !
अमरावतीमध्येही आंदोलन
अमरावतीच्या मध्यवर्ती बसस्थानकासमोर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळी ११:३० वाजता आंदोलन छेडले. जिल्हाप्रमुख पराग गुडधे आणि मनोज कडू यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामुळे एसटी स्थानकात प्रचंड गर्दी उसळली. एसटी महामंडळाच्या तिकीट दरवाढीमुळे प्रवाशांवर आर्थिक भार पडत आहे, असे सांगत ठाकरे गटाने सरकारवर जोरदार टीका केली.








