Breaking

CM Devendra Fadnavis : शक्तीपीठ महामार्गाचे काम पुन्हा सुरू होणार !

Start the work of Shaktipeeth Highway said CM Devendra Fadnavis : सर्वांना विश्वासात घेऊन काम सुरू करण्याचे निर्देश

Mumbai गेल्यावर्षी ऑक्टोबमध्ये शक्तीपाठ महामार्ग रद्द करण्यात आला होता. राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ऐन विधानसभा निवडणुकीच्या आधी रद्द केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले गेले. नागपूर ते गोवा हा महामार्ग राज्यातील १२ जिल्ह्यांमधून जाणार होता. त्याला काही जिल्ह्यांमध्ये विरोध होता. निवडणुकीत त्याचा फटका बसू शकतो, याचा विचार करून महामार्ग रद्द करण्याची घोषणा करण्यात आली. परंतु, आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महामार्गाचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्यातील दळणवळण सुविधा तसेच व्यावसायिक संधी, त्याचसोबत पर्यटनाला व्यापक प्रमाणात गती देणारा हा प्रकल्प आहे. शासनाच्या या महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गाच्या कामाचे नियोजन पुन्हा एकदा करा. पण सर्वांना विश्वासात घेऊन तत्परतेने सुरु करा, असे मुख्यमंत्र्यांनी सोमवारी (दि. १३ जानेवारी) प्रशासनाला सांगितले. सह्याद्री अतिथिगृह येथे आगामी शंभर दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाने करावयाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला.

Buldhana Jijau Birthplace : जिजाऊ जन्मस्थळाच्या विकासासाठी पवळ सरसावले !

बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, श्रीमती मेघना बोर्डीकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, यांच्यासह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, सचिव सदाशिव साळुंखे, सचिव ए.दशपुते, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व्यवस्थापक अनिल गायकवाड यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

‘राज्यातील महामार्गाची उभारणी तसेच रस्त्यांचे जाळे दर्जैदार आणि अधिक व्यापक करायचे आहे. त्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने नियोजन करावे. राज्यातील धार्मिक स्थळांना जोडणारा आणि पर्यटन उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन देणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाची उभारणी दर्जैदार असावी. त्यामुळे प्रक्रिया वेगाने सुरू करा,’ असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

Anil Deshmukh : वाल्मिक कराडवर मकोका का लावत नाही ?

समृद्धीचा उर्वरित भाग फेब्रुवारीपर्यंत
समृद्धी महामार्गाच्या उर्वरित अंतिम टप्प्याचे आमणेपर्यंतचे ७६ कि.मी. लांबीचे काम तत्परतेने पूर्ण करा. फेब्रुवारीपर्यंत हा महामार्ग पूर्णपणे खुला करावा. तसेच यावर्षी समृद्धी महामार्गाचे कर्ज रोखे प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. प्रवाशांना उपयुक्त ठरणाऱ्या मुबंई – पुणे द्रुतगती मार्गावरील १३.३० कि.मी. मिसिंग लिंकचे कामही गतीने पूर्णत्वास न्यावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सूचित केले आहे.