State debt : राज्यावर १० लाख कोटींचे कर्ज, लोढांच्या विभागावर आरोप !

Sanjay Raut criticizes debt, corruption on reservation issue : संजय राऊतांची कर्ज, भ्रष्टाचार आरक्षणाच्या मुद्द्यावर टीका

Mumbai : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. राज्यातील आर्थिक स्थिती, वाढते कर्ज, भ्रष्टाचार आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर तीव्र टीका केली. “महाराष्ट्रात जातविरोधी भांडणं लावून लोकांचं लक्ष विचलित केलं जात आहे. शिक्षण, रोजगार, प्रगती यावर सरकारकडे काही सांगण्यासारखं नाही. उलट राज्य दहा लाख कोटींच्या कर्जाच्या डोंगराखाली दबलं आहे,” असा आरोप राऊतांनी केला.

राऊत म्हणाले, “राज्यात इतकी लूट सुरू आहे की तिचा परिणाम राज्याच्या तिजोरीवर दिसतोय. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट सांगावं की हे कर्ज कसं वाढलं, कोणत्या योजनांमुळे वाढलं? लोकांच्या पैशाचा मोठा हिस्सा कुणाच्या तरी खिशात जातोय. तीन-तीन हजार कोटींची टेंडरं अगोदरच करून टाकली जातात, ठेकेदारांकडून २५ टक्के कमिशन घेतलं जातं. हे लूटमारीचं राजकारण आहे.”

Cabinet meeting : कॅबिनेट बैठकीत ओल्या दुष्काळाच्या निर्णयाची प्रतीक्षा !

मुंबई महापालिकेतील कामांवरूनही राऊतांनी सरकारवर निशाणा साधला. “मुंबई महापालिकेकडून दोन लाख कोटींची कामं कागदावर दाखवली गेली आहेत. पण प्रत्यक्षात त्याचा ठावठिकाणा नाही. हा पैसा कुठे गेला? एसआरए प्रकल्पातही मोठा भ्रष्टाचार झाला आहे. लोढा यांच्या कौशल्य विकास विभागात तर सर्वाधिक भ्रष्टाचार झाल्याचं स्पष्टपणे दिसत आहे,” असा गंभीर आरोप राऊतांनी केला.

अजित पवारांवर थेट टीका करताना ते म्हणाले, “अर्थव्यवस्था वाचवण्याऐवजी अजित पवार स्वतःच्या लोकांना महाराष्ट्र लुटायला देत आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असोत किंवा अजित पवार अर्थमंत्री, हे सगळे मिळून राज्याचा गाळ काढत आहेत. अमित शहांच्या कृपेने चंबळखोऱ्यातून आलेले डाकू आज महाराष्ट्र लुटत आहेत. मग पुढल्या पिढीचं काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

नेपाळचा संदर्भ देत राऊत म्हणाले, “नेपाळलाही सत्ताधाऱ्यांनी अशाच प्रकारे लुटलं. त्यातून जो उद्रेक झाला तो धक्कादायक होता. मी त्याचं समर्थन करत नाही, पण महाराष्ट्रातही लोकांच्या संयमाचा बाण तुटू शकतो. आज राज्यावर दहा लाख कोटींचं कर्ज आहे आणि तरीही हे सरकार महाराष्ट्राला प्रगतीपथावरचं राज्य म्हणतं, हे दुर्दैवी आहे.”

Banjara Community : बंजारा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर बुलडाण्यात तातडीची बैठक

राऊतांच्या या टीकेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, राज्याच्या आर्थिक व्यवस्थेवरील सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे