Letters will be sent to all MPs seeking support for the Vice President election : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी खासदारांना पत्र पाठवणार
Mumbai उपराष्ट्रपती तथा राज्यसभा सभापती हे पद अत्यंत महत्त्वाचे आहे. विविध भाषा, जात, धर्म व पंथाचे प्रतिबिंब राज्यसभेत दिसले पाहिजे. देश सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे, मला देशाची सेवा करण्याची संधी मिळाली तर राज्यघटनेचे संरक्षण करेन, असा विश्वास उपराष्ट्रपती पदाचे इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी व्यक्त केला आहे.
इंडिया आघाडीने मला उमेदवारी दिली असून मला पाठिंबा मिळावा यासाठी मी सर्व राजकीय पक्षांच्या खासदारांना वैयक्तीक पत्र पाठवून विनंती करणार आहे. भाजपाच्या खासदारांनी वेळ दिली तर त्यांनाही भेटेन असे रेड्डी यांनी सांगितले. या निवडणुकीत व्हीप नसतो, गुप्त मतदान असते, त्यामुळे माझी उमेदवारी योग्य वाटत असेल तर मला मतदान करावे, अशी सर्वपक्षीय खासदारांनी विनंती करतो, असेही रेड्डी म्हणाले.
Chandrashekhar Bawankule : वितरीत निधी खर्च झाला नाही तर थेट कारवाई
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले की, आज देश संकटात असताना लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतलेला असून उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ही लोकशाहीचा जागर आहे. संविधान रक्षणाचा संकल्प घेऊन बी. सुदर्शन रेड्डी सर्व राजकीय पक्षांना भेटून संवाद साधत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचीही त्यांनी भेट घेतली असून त्यांची सकारात्मक चर्चा झाली आहे. देशातील आजची राजकीय परिस्थिती पाहचा निकाल चमत्कारिक असू शकतात.








