BJP Announces General Secretary and Alliance Chief for Ballarpur Assembly Constituency : येत्या दोन दिवसांत मंडल कार्यकारिणी, प्रकोष्ठ अध्यक्ष व महामंत्र्यांची घोषणा करण्याचे निर्देश
Chandrapur : राज्याचे माजी मंत्री, लोकनेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सुचनेनुसार त्यांच्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या मंडळ अध्यक्षांनी आपापल्या मंडळातील तालुका महामंत्री आणि आघाडीच्या अध्यक्षांची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर आमदार मुनगंटीवार यांच्या सुचेनुसार येत्या दोन दिवसांत संपूर्ण मंडळ कार्यकारिणी, उर्वरित आघाडी व प्रकोष्ठचे अध्यक्ष आणि महामंत्र्यांची घोषणा करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
बल्लारपूर शहर मंडल बल्लारपुर मंडलाचे अध्यक्ष ॲड. रणजंय सिंह यांनी संघटन महामंत्री म्हणून मनीष पांडे व महामंत्रीपदी सतीश कनकम, देवेंद्र वाटकर, घनश्याम बुरडकर यांची तर युवा मोर्चा अध्यक्षपदी मिथलेश खेंगर व महीला आघाडी अध्यक्षा वैशाली जोशी यांची घोषणा केली.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवार म्हणाले, उद्योगांच्या मागणीनुसार कुशल मनुष्यबळ तयार करा !
बल्लारपूर ग्रामीण
बल्लारपूर ग्रामीणचे चंद्रकांत देऊळकर यांनी महामंत्रीपदी सुनील फरकडे, श्रावण सातपुते, गणेश टोंगे, रुमदेव देरकर तसेच युवा मोर्चा अध्यक्षपदी संदीप पोडे, महीला आघाडी अध्यक्षपदी वैशाली बुद्धलवार यांची घोषणा केली आहे.
पोंभूर्णा मंडल
पोंभूर्णा मंडलांचे अध्यक्ष हरिश ढवस यांनी महामंत्रीपदी विनोद देशमुख, ज्योती बुरांडे, गुरुदास पिपरे तसेच युवा मोर्चा अध्यक्षपदी अजय मस्के, महीला आघाडी अध्यक्षपदी वैशाली बोलमवार यांची घोषणा केली आहे.
मूल ग्रामीण मंडल
मुल ग्रामीणचे अध्यक्ष चंदु मारगोनवार यानी महामंत्री पदी संजय येनुरकर,बंडु नर्मलवार डॉ. गुरुदास भेंडारे तसेच युवा मोर्चा अध्यक्ष पदी श्रीधर पाकमोडे , महिला आघाड़ी अध्यक्ष पदी अर्चना बल्लावार यांची घोषणा केली आहे.
Sudhir Mungantiwar : चंद्रपूरच्या रस्ते अन् उड्डाणपूलांसाठी मुनगंटीवारांची आग्रही मागणी
चंद्रपुर तालुका
चंद्रपुर तालुका अध्यक्ष श्रीनिवास जनगम यांनी महामंत्री पदी शांताराम चौखे, संजय यादव, अमोल जगताप,तसेच युवा मोर्चा अध्यक्ष पदी नागेश कडूकर महिला आघाड़ी अध्यक्ष पदीअनिता भोयर यांची घोषणा केली आहे.
मूल शहर
मूल शहर अध्यक्ष प्रवीण मोहुर्ले यांनी महामंत्रीपदी प्रशांत बोबाटे, दादाजी येरणे, जितेंद्र टिंगसुले तसेच युवा मोर्चा अध्यक्ष पदी पंकज लाडवे महिला आघाडी अध्यक्षपदी मनिषा गांडलेवार यांची घोषणा केली आहे.
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नवनियुक्त महामंत्री व आघाडी अध्यक्षांना आगामी संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्या गुरनुले, प्रदेश सचिव विद्या देवाडकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेणुका दुधे, महिला आघाडी प्रदेश महामंत्री अल्का आत्राम, जिल्हा महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, विवेक बोढे, रामपाल सिंह, माजी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, पोंभूर्णा नगर पंचायत अध्यक्ष सुलभा पिपरे, उपाध्यक्ष अजित मंगळगिरीवार, प्रभाकर भोयर, किशोर पंदिलवार, काशीनाथ सिंह, हनुमान काकडे, नंदु रणदिवे, राहुल संतोषवार, राजू बुद्दलवार आदींनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले आहे.








