The revival of the Zarpat River is not just an initiative, but an important decision for the future : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंना पुनरुज्जीवन व सौंदर्यीकरणासाठी पत्र
Chandrapur : चंद्रपूर शहरातून वाहणाऱ्या झरपट नदीमध्ये वाढलेली जलपर्णी महाकाली यात्रेतील भाविकांसाठी अडचणीची ठरत आहे. त्यामुळे नदीचे सौंदर्यीकरण, खोलीकरण आणि स्वच्छता आवश्यक आहे. तसेच नदीचे पुनरुज्जीवन करणे अत्यावश्यक आहे. याकरिता राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे.
झरपट नदीचे पुनरुज्जीवन व सौंदर्यीकर करण्यासाठी तज्ज्ञ टिम नेमून प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आमदार मुनगंटीवार यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना पत्र दिले आहे. चंद्रपूर शहरातून वाहणारी झरपट नदी केवळ एक जलस्रोत नाही, तर शहराच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाचा एक अविभाज्य भाग आहे. गोंडकालीन किल्ल्यांच्या सान्निध्यातून वाहणारी ही नदी चंद्रपूरच्या सौंदर्यात भर घालते. मात्र, गेल्या काही दशकांपासून तिची दुरवस्था झाली आहे. स्वच्छता, खोलीकरण आणि सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने दुर्लक्ष झाले आहे. मात्र आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नदीच्या पुनरुज्जीवनाचा निर्धार केला आहे.
Dr. Pankaj Bhoyar : विज्ञान स्पर्धेच्या बक्षिसात होणार वाढ; प्रथम पुरस्कार ५१ हजाराचा!
विशेषतः माता महाकाली मंदिराच्या भक्तांसाठी आणि यात्रेकरूंना ही नदी श्रद्धास्थान वाटते. त्यामुळे या नदीचे संवर्धन म्हणजे केवळ पाण्याचा प्रश्न सोडवणे नव्हे, तर शहराच्या सांस्कृतिक अस्मितेचे जतन करणेही आहे. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येऊन नदीच्या स्वच्छतेसाठी मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने आमदार मुनगंटीवार यांनी स्थानिक प्रशासनाला सुद्धा यासंदर्भात कळविले आहे.
झरपट नदीचे पुनरुज्जीवन केवळ पर्यावरणपूरक उपक्रम नसून, चंद्रपूरच्या भविष्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय ठरेल, असा विश्वास आमदार मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस पावले उचलण्याची गरज आहे. सर्वांनी एकत्र येऊन झरपट नदीला पूर्वीचे वैभव मिळवून देणे हे कर्तव्य आहे, असेही मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
Vijay Wadettiwar : छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या कोरटकरला सुरक्षा का?
यासाठी भाजप महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे व पदाधिकाऱ्यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे झरपट नदीचे सौंदर्यीकरण, संवर्धन आणि पुनरुज्जीवन करण्यासंदर्भात निवेदनातून मागणी केली होती. त्यावर त्यांनी दखल घेत पाठपुरावा केला आहे, हे विशेष.