A call from Sudhir Mungantiwar and clean, cold water became available at the Mul bus stand : एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रक स्मिता सुतावणे यांना आरओ मशीन्स तात्काळ दुरूस्त करण्यास सांगितले
Chandrapur : चंद्रपूर हा जगातील सर्वाधीक उष्णता असलेला जिल्हा आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या क्रमवारीत उष्णतेच्या बाबतीत चंद्रपूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. अंगाची लाही लाही करणाऱ्या या उन्हात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मूल बसस्थानकावर पिण्याचे पाणी मिळत नव्हते. काही लोकांनी याची तक्रार राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. त्यांनी तात्काळ दखल घेऊन प्रशासनाला निर्देश दिले. त्यानंतर लगेच तेथील आरओ मशीन्स सुरू झाल्या.
आमदार मुनगंटीवार यांनी तात्काळ दखल घेतल्यामुळे मूल बसस्थानकावर आता प्रवाशांना थंड पाणी मिळते आहे. प्रवाशांनी याबद्दल त्यांचे आभार मानले आहे. आमदार मुनगंटीवार नागरी समस्या सोडवण्यासाठी तत्पर असतात. त्यांच्या संवेदनशीलतेची प्रचिती नागरीकांना पुन्हा एकदा आली. उन्हाच्या या तडाख्यात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थंड व शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणे, हा प्रवाशांचा अधिकार आहे. मात्र काही दिवसांपासून मूल बसस्थानकावरील आरओ मशीन्स बंद पडल्या होत्या.
Jammu Kashmir terrorist attack : काश्मीरचं सौंदर्य घायाळ करणारं, पण आता ‘घायाळ’ व्हायला जाणार कोण ?
बसस्थानकावर प्यायला पाणी मिळत नसल्याने प्रवाशांचे हाल होत होते. ही माहिती मूल येथील स्थानिक लोकांनी आमदार मुनगंटीवार यांना दिली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रक स्मिता सुतावणे यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना आरओ मशीन्स तात्काळ दुरूस्त करण्यास सांगितले. आमदार मुनगंटीवार यांच्या निर्देशानंतर काही तासातच मशीन्स सुरू झाल्या. त्यामुळे आता प्रवाशांना पुन्हा पिण्याचे शुद्ध आणि थंड पाणी उपलब्ध झाले आहे.
Jammu Kashmir terrorist attack : आतापर्यंत ५०० पर्यटक दाखल, अमरावती, अकोल्यातील पर्यटक आज येणार !
जनतेच्या गरजा ओळखून त्यांना तात्काळ प्रतिसाद देण्यास आमदार मुनगंटीवार सज्ज असतात. त्यांना काम सांगितले की झालेच पाहिजे, हा विश्वास लोकांमध्ये आहे. त्यांची कृती जनतेचा विश्वास दृढ करणारी आहे. सजगता आणि तत्परता हाच त्यांचा जनसेवेचा मंत्र आहे, हे त्यांनी पुन्हा अधोरेखीत केले.