Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचे प्रयत्न, चंद्रपुरात लवकरच गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र

A sub-center of Gondwana University will soon be set up in Chandrapur : 414.74 कोटींच्या प्रस्तावाला मिळणार मंजुरी, उच्च शिक्षणाचे नवे दालन खुले होणार

Chandrapur राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या आणखी एका प्रयत्नाला यश आले आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर चंद्रपूर येथे गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापन करण्यासाठी तब्बल ₹414.74 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. तसेच पुढील कार्यवाहीसाठी सकारात्मक आश्वासन दिले. हा प्रस्ताव लवकरच मंत्रीमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे चंद्रपूरसह विदर्भातील हजारो विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे नवे दालन खुले होणार आहे.

या निर्णयामुळे शैक्षणिक विकासाला ऐतिहासिक गती मिळेल, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. “प्रयत्नात सातत्य असेल तर यश हमखास मिळते,” या उक्तीवर विश्वास ठेवून मुनगंटीवार यांनी पाठपुरावा केला. त्यांच्या अथक प्रयत्नातून आता चंद्रपूरमध्ये गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र वास्तवात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Sudhir Mungantiwar : फक्त सांस्कृतिक भवनाला मंजुरी देऊन थांबतील ते मुनगंटीवार कसले !

2025 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथे गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापन करण्याच्या विषयावर विधानसभेत जवळपास अर्धा तास सविस्तर चर्चा केली होती. या चर्चेत त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे भौगोलिक महत्त्व, विदर्भातील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या शैक्षणिक अडचणी आणि त्यातून निर्माण होणारे आर्थिक-सामाजिक प्रश्न याचा ऊहापोह केला होता. तसेच चंद्रपूर येथे उपकेंद्राची आवश्यकता अधोरेखित करताना, त्यातून स्थानिक विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या नव्या संधी, शैक्षणिक दर्जा उंचावणे आणि विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी होणारे दूरगामी परिणाम यांची ठोस मांडणी त्यांनी सभागृहासमोर केली होती.जनतेच्या हिताचे प्रश्न मांडण्यासाठी आणि त्यांचे समाधान करण्यासाठी मुनगंटीवार यांनी नेहमीच अभ्यासू व पोटतिडकीने संघर्ष केला आहे.

Sudhir Mungantiwar : पोलीस अधिकारी, बांधवांच्या गृह कर्ज प्रश्नावर तोडगा!

गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती

सुधीर मुनगंटीवार यांनी यापूर्वी, चंद्रपूर-गडचिरोली या आदिवासीबहुल जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी दि. 30 मार्च 2007 रोजी विधानसभेत नागपूर विद्यापीठाच्या विभाजनातून स्वतंत्र गोंडवाना विद्यापीठ स्थापन करण्याचा अशासकीय ठराव मांडला होता. नंतर त्यांनी तारांकित-अतारांकित प्रश्न, कपात सूचना अशा संसदीय आयुधांच्या माध्यमातून पाठपुरावा केला आणि पत्रव्यवहार केला. या संसदीय संघर्षाच्या फलस्वरूप सन 2011 मध्ये गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती झाली.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवार – फडणवीस भेटीची होणार फलश्रुती !

संसदीय आयुधांचा उपयोग अन् पाठपुरावा

संसदीय आयुधांचा उपयोग करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा नामविस्तार केला.वैराग्यमूर्ती गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा नामविस्तारही सुधीर मुनगंटीवार यांनी केला.पुणे विद्यापीठाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यासाठी संसदीय पाठपुराव्याला मोठे यश आ. मुनगंटीवार यांना आले. सुधीरभाऊ जेव्हा पाठपुरावा करतात तेव्हा यश हमखास येते, हे विशेष.