Breaking

Sudhir Mungantiwar : झरपट नदीपाठोपाठ ईरई नदीसाठीही सरसावले आमदार मुनगंटीवार !

 

After pollution and sports complex, MLA Mungantiwar also came forward for Irai river : विधानसभेत सादर केला विनंती अर्ज, ठोस निर्णय होणार !

Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासात राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे योगदान मोठे आहे. जिल्ह्यातील कोणताही विषय असो, ते सदैव तत्पर असतात. आताही गेल्या कित्येक वर्षांपासून खितपत पडलेला चंद्रपुरातील इरई नदीचा प्रश्न त्यांनी विधानसभेत उचलला. त्यासाठी विधानसभेत विनंती अर्जही सादर केला. यापूर्वी त्यांनी पूर्णपणे प्रदूषीत झालेल्या झरपट नदीचाही विषय तात्काळ मार्गी लावला होता.

चंद्रपूर भाजपा महानगराचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे व पदाधिकाऱ्यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे झरपट नदीचे सौंदर्यीकरण, संवर्धन आणि पुनरुज्जीवन करण्याची मागणी केली होती. त्यांनी दखल घेत पाठपुरावा केला. माता महाकाली यात्रेकरूंसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्या, यासाठी त्यांनी विशेष निधीची मागणी केली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत विशेष बैठकही घेतली. त्यानंतर चंद्रपूर शहरातील सोयीसुविधांसाठी २ कोटी ९० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासंदर्भातील शासनादेश ११ मार्चला निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यानंतर पायाभूत सुविधांसह झरपट नदीचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. आता इरई नदीचा विषय आमदार मुनगंटीवार यांनी हाती घेतल्याने इरई नदीचे रुपडेही लवकरच पालटेल, असा विश्वास चंद्रपूरकरांना आहे.

Sudhir Mungantiwar : ऑलिम्पिकमध्ये चंद्रपूरला नवी ओळख देण्याचा मुनगंटीवारांचा निर्धार!

चंद्रपूरचे पर्यावरण आणि पाणी पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या इरई नदीच्या संवर्धन व संरक्षणासाठी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी विधानसभेत अधिकृत विनंती अर्ज सादर केला असून विधानसभा अध्यक्षांनी तो समितीकडे पाठवला आहे.

गाळ साचल्याने पूरस्थितीचा धोका..
इरई नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने नदी उथळ झाली आहे आणि काटेरी झुडपांची वाढ झाली आहे. परिणामी, दरवर्षी पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. पूर आल्यास शहरालगतच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरते आणि नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होतो. तसेच, यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक हानीही होत आहे.

Sudhir Mungantiwar : आणीबाणीच्या लढ्यातील सैनिकांना २० हजार रुपये द्या !

 

सततच्या पाठपुराव्याने उपाययोजनेचा मार्ग सुकर..
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषण प्रश्नाच्या पाठोपाठ आता इरई नदीच्या संवर्धनाचा विषय विधानसभेत मांडला आहे. विधानसभा विनंती अर्ज समितीच्या माध्यमातून तात्काळ आणि दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याचा मार्ग सुकर होईल, अशी अपेक्षा आहे.

विधानसभेतील संसदीय माध्यमांचा प्रभावी उपयोग..
विधानसभेत अनेक संसदीय उपाय उपलब्ध असतानाही काही समस्या दीर्घकाळ प्रलंबित राहतात. अशा वेळी विधानसभा विनंती अर्ज समितीचा पर्याय जनहितासाठी प्रभावी ठरतो. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सक्रिय प्रयत्नांमुळे या विषयावर ठोस निर्णय होण्याची शक्यता बळावली आहे.

Sudhir Mungantiwar : पंधरा दिवसांत चंद्रपूरमध्ये येऊन प्रदूषणाच्या समस्यांवर तोडगा काढणार !

 

नदी संवर्धनासाठी नागरिकांचीही भूमिका महत्त्वाची..
इरई नदी ही चंद्रपूरकरांची जीवनदायिनी असून, तिच्या संवर्धनासाठी प्रशासनाच्या उपाययोजनांबरोबरच नागरिकांचाही सक्रीय सहभाग आवश्यक आहे. नदी स्वच्छता मोहिमा, गाळ काढण्याच्या योजना आणि पूरनियंत्रण उपायांसाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे इरई नदीच्या संवर्धनासाठी उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल चंद्रपूर जिल्ह्याच्या पर्यावरणीय आणि पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे या विषयावर चर्चा घडून येईल आणि आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, अशी अपेक्षा आहे. आता विधानसभा विनंती अर्ज समिती या विषयावर काय कार्यवाही करते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. इरई नदीचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी तात्काळ आणि प्रभावी निर्णय घेण्यात यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.