Breaking

Sudhir Mungantiwar : विधानसभा अध्यक्ष म्हणाले, मुनगंटीवार यांच्या मुद्द्यात मेरीट आहे !

 

Assembly Speaker Rahul Narvekar said, there is merit in Sudhir Mungantiwar’s issue : दिले थेट निर्देश, आता मंत्र्यांवर येणार ‘ही’ बंधने

Mumbai : सभागृहात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे वेळेत मिळत नाहीत, २६ जुलै २०२३च्या प्रश्नाचे उत्तर अद्यापही न मिळाल्याने राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात नाराजी व्यक्त केली. हा मुद्दा मांडल्यानंतर विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी त्वरीत दखल घेतली. ‘आमदार मुनगंटीवार यांच्या मुद्द्यात मेरीट आहे’, असे म्हणत तात्काळ निर्देश दिले.

झाले असे की, आमदार मुनगंटीवार यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर विहित मुदतीत मिळाले नाही. मुदत संपून गेल्यावरही उत्तर आले नाही. त्यामुळे आता विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर पुढील अधिवेशात दिले पाहिजे, असे आमदार मुनगंटीवार म्हणाले. आणि यासाठी निर्देश देण्याची विनंतीही अध्यक्षांना केली. ते म्हणाले. निवडणूक संपल्यावर नवीन विधानसभा गठीत होते आणि त्यानंतर ते सदस्य सभागृहात नसले की त्या प्रश्नाचे गांभीर्यही निघून जाते.

Sudhir Mungantiwar : चंद्रपुरातील फर्निचर अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये पोहोचवू!

प्रश्नाचा गंभीरतेशी असलेला संबंध संपून जातो. त्यामुळे पुढच्या अधिवेशनात तरी माहिती मिळावी, अशी विनंती आमदार मुनगंटीवार यांनी केली. अध्यक्षांनी याची तात्काळ दखल घेतली. ते म्हणाले, मंत्र्यांकडे माहिती नसेल तर पटलावर ठेवण्याची मुभा आपण देतो. पण ती मुभा पाच वर्षांची नसते. तर अधिवेशन संपेपर्यंत किंवा पुढच्या अधिवेशनापर्यंत असते. यापुढे मंत्री जेव्हा ‘पटलावर ठेवतो..’, असे वक्तव्य करतील तेव्हा ती माहिती ते अधिवेशन संपेपर्यंत किंवा पुढच्या अधिवेशनात देणं बंधनकारक राहिल, असे स्पष्ट निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दिले.

Sudhir Mungantiwar : चंद्रपूरच्या माता महाकाली यात्रेकरूंसाठी मोठा दिलासा!

आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहातील सर्व सदस्यांच्या मनातील प्रश्न उपस्थित केला. त्यावर अध्यक्षांनी तात्काळ निर्देशही दिले. त्यामुळे यापुढे मंत्र्यांवर ती बंधने येणार आहेत. याचा फायदा सर्व सदस्यांना होणार आहे. सुधीर मुनगंटीवार सर्व संसदीय आयुधांचा अत्यंत हुशारीने योग्य वेळी योग्य वापर करतात, असे जे म्हटले जाते, ते उगाच नाही. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.