Sudhir Mungantiwar : लोकांचे प्रेम हेच खरे सेवाकार्याचे टॉनिक !

Beloved sisters honored their beloved brother : बहीणींचा आशीर्वाद मिळाला की जगातील कुठलीही ताकद आपले वाईट करू शकत नाही

Chandrapur : जनतेच्या प्रेमामुळे अधिक काम करण्याची, शक्तीने सेवा करण्याची प्रेरणा मिळते. जनतेच्या प्रेमातूनच खरी शक्ती मिळत असते. सेवाकार्य करण्याचे तेच खरे टॉनिक असते. आज माझ्या वाढदिवसानिमित्त लाडक्या बहीणींनी सत्कार केला. बहीणींचा आशीर्वाद मिळाला तर जगातील कुठलीही ताकद आपले वाईट करू शकत नाही, अशी भावना राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

लोकांचे प्रेम मिळत आहे. म्हणूच सर्वसामान्यांचा आवाज बनून सभागृहात लढणे शक्य होत आहे. या प्रेमामुळेच गरीबांची सेवा करण्याची ऊर्जा मिळते आहे. या प्रेमाच्या कर्जातून कधीही मुक्त होऊ शकणार नाही. बल्लारपूर येथील माजी नगरसेवक महेंद्र ढोके यांनी आयोजित केलेल्या सोहळ्यात लाडक्या बहीणींनी आमदार मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाहिर सत्कार केला. या सत्काराला उत्तर देताना आमदार मुनगंटीवार बोलत होते.

Dattatray Bharne : एखादं वाकडं काम करून परत सरळ केलं त्याची नोंद होते

या कार्यक्रमाला वनविकास मंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, भाजपा बल्लारपूर शहराध्यक्ष रणंजय सिंह, माजी अध्यक्ष काशी सिंह, निलेश खरबडे, समीर केणे, मनीष पांडे, देवेंद्र वाटकर, सतीश कनकम, कांता ढोके, जयश्री मोहुर्ले, रेणुका दुधे, पुनम मोडक, सुवर्णा भटारकर, विद्या देवाळकर, सचिन जाधव, सारिका कनकम, आरती आक्केवार, किशोर मोहूर्ले, विक्की दुपारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आमदार मुनगंटीवार म्हणाले, माझा वाढदिवस सेवादिन म्हणून साजरा केला. सर्वांच्या साक्षीने प्रेम व्यक्त केले. याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. गरीबांच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच आमचे ध्येय आहे. एखादा कार्यकर्ता अशा पद्धतीने जनतेची, निराधारांची सेवा करतो. गरीबांचे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण शक्तीने काम करतो, तेव्हा खूप आनंद होतो. भारतीय जनता पक्षाची खरी संपत्ती मरेंद्र ढोके यांच्यासारखे कार्यकर्ते आहेत.

Chandrashekhar Bawankule : जनतेमध्ये आक्रोश निर्माण झाला की असा निर्णय घ्यावा लागतो !

सन १९९८ पासून वाढदिवसाला मी कुठल्यातरी मंदिरात असतो. यंदाही मी उज्जैनला भगवान महादेवाच्या दर्शनासाठी गेलो होतो. माझ्यासह कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेला भरपूर सुख – समृद्धी देण्याची कामना केली, असेही आमदार सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले.