Breaking

Sudhir Mungantiwar : योग ही केवळ साधना नव्हे, तर असामान्य सामर्थ्याची अनुभूती !

BJP leader Sudhir Mungantiwar said that Yoga Day reached the global level due to the concept of PM Narendra Modi : बल्लारपूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम उत्साहात

Nagpur : आज आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात साजरा केला जात आहे. या दिवसाची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली होती आणि ती प्रत्यक्षात उतरवली. पूर्वी काही विशिष्ट स्तरांतील लोकांपर्यंत मर्यादित असलेले योगाचे महत्व आता प्रत्येकाला पटलेले आहे. आजच्या दिवशी जगभरातील लोक एकत्र येऊन योग करून हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतात.योग केवळ व्यायाम नसून शाश्वत आरोग्य,मानसिक समतोल आणि आत्मिक उन्नतीची साधना आहे, असे राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार मुनगंटीवार म्हणाले.

आज साजरा केला जात असलेला योग दिवस हा ११वा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार आज (ता. २१ जून) वर्षातील सर्वात मोठ्या दिवशी सर्वत्र योग दिवस साजरा करण्यात आला. आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा मतदारसंघ असलेल्या बल्लारपूर येथेही योग दिवसानिमित्त भव्य आयोजन करण्यात आले होते. यासाठी बल्लापुरातील एकदंत लॉन येथे भल्या पहाटे आमदार मुनगंटीवार पोहोचले. खुद्द आपले मार्गदर्शक नेते आल्यामुळे तेथे उपस्थित योग साधकांचा उत्साह वाढला आणि योगसाधनेने या दिवसाची सुरूवात हजारो लोकांनी उत्साहात केली.

Amit Shah : देशात २ लाख नवीन प्राथमिक कृषी पतसंस्था स्थापन करणार

आमदार मुनगंटीवार यांनी आपल्या सोशल मिडिया हॅन्डल्सवर योग दिनाचे महत्व विषद केले. यामध्ये ते लिहितात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जागतिक स्तरावर पोहोचलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बल्लारपूर येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी झालो आहे. योगामुळे केवळ शरिराचीच नव्हे, तर मन, बुद्धी आणि आत्म्याचीही शुद्धता साध्य होते. योग हा केवळ व्यायाम नसू शाश्र्वत आरोग्य, मानसिक समतोल आणि आत्मिक उन्नतीचा साधना आहे.

Bondekar Vs fuke: फुकेंनी शिंदे सेनेची तोडफोड करण्यापेक्षा भाजप वाढवण्यावर फोकस करावा

कृष्णाची गहलोतची विलक्षण कामगिरी..
बल्लारपूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात १४ वर्षीय कृष्णा गहलोत याने एकाच सत्रात एक हजार दंडबैठका आणि ५०० सूर्य नमस्कार करून सर्वांना थक्क केले. या विलक्षण कामगिरीबद्दल आमदार मुनगंटीवार यांनी कृष्णाचे विशेष कौतुक केले. योग ही केवळ साधना नसून असामान्य सामर्थ्याची अनुभूती आहे. योगचे महत्व मानवी जीवनात अनन्यसाधारण आहे, असेही आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले.