Breaking

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांची मागणी अन् मुख्यमंत्र्यांनी दिल्या बल्लारशाह जीआरपी पोलिस स्टेशन निर्माण करण्याच्या सुचना !

BJP leader Sudhir Mungantiwar’s demand and the Chief Minister Devendra Fadanvis gave instructions to set up a GRP police station in Ballarpur : महाराष्ट्र व तेलंगणा सीमेवरील महत्वाचे रेल्वे स्थानक

Chandrapur : जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव सजग असलेले राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आणखी एक लोकहितकारी काम मार्गी लावले आहे. बल्लारशाह येथे स्वतंत्र जीआरपी पोलिस ठाण्याची मागणी काही वर्षांपासून प्रलंबित होती. प्रवाशांच्या मागणीवरून आमदार मुनगंटीवार यांनी याकामी पुढाकार घेतला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी लाऊन धरली. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत स्वतंत्र जीआरपी पोलिस ठाणे निर्माण करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात आमदार मुनगंटीवार लिहितात, बल्लारशाह हे महाराष्ट्र व तेलंगणाच्या सीमेवरील अत्यंत महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. येथे दररोज तीन हजारहून अधिक प्रवाशांचे आवागमन असते. सद्यस्थितीत येथे केवळ जीआरपीचे आऊट पोस्ट कार्यरत आहे. या आऊट पोस्टची कार्यक्षमता मर्यादित आहे. या ठिकाणासाठी जवळचे जीआरपी स्टेशन वर्धा येथे आहे. ते येथून तब्बल १२० किलोमीटर अंतरावर आहे. वर्धा जीआरपीचे कार्यक्षेत्र चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा आणि यवतमाळ जिल्ह्यापर्यंत पसरलेले आहे. एकुण १९ रेल्वे स्थानके यामध्ये येतात.

Sudhir Mungantiwar : सुधीर भाऊंच्या भाषणांकडे जरी लक्ष दिलं, तर प्रत्येक आमदाराची एक टर्म वाढू शकते !

रेल्वे उपभोक्ता सल्लागार समिती (झेडआरयुसीसी) मध्ये रेल्वे मुंबईचे अजय दुबे यांनी हा विषय आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणून दिला होता. बल्लारशाह रेल्वे स्टेशनवर गंभीर घटनांचे प्रमाण वाढत आहे. स्वतंत्र पोलिस ठाणे नसल्यामुळे तपास प्रक्रिया, प्रवाशांच्या मदतीची तत्परता आणि एकुणच कायदा व सुव्यवस्था प्रभावित होत आहे. त्यामुळे स्वतंत्र जीआरपी पोलिस ठाणे गरजेचे आहे, ही बाब अधोरेखीत करत आमदार मुनगंटीवार यांनी मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. त्यावरून मुख्यमंत्र्यांनी उपरोक्त सुचना दिल्या.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवार स्वतः करणार जुनगाव पुरग्रस्त भागाची पाहणी !

रश्मी शुक्ला यांनाही दिले होते निवेदन..
बल्लारशाह रेल्वे स्टेशनवर जीआरपी पोलिस ठाणे निर्माण करायचेच हा निर्धार आमदार मुनगंटीवार यांनी केला होता. त्यामुळे त्यांनी यासंदर्भात पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनाही निवेदन दिले होते. रेल्वे दूरक्षेत्र पोलिस चौकीचे स्वतंत्र पोलिस ठाण्यात रुपांतर करण्याची विनंती त्यांनी केली होती. सर्व मार्गांनी प्रयत्न केल्यानंतर आता बल्लारशा येथे स्वतंत्र जीआरपी पोलिस ठाणे निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.