Chandrapur, Gadchiroli to Train Skilled Manpower for Industry Needs : कौशल्य प्रशिक्षणातून स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्या
Chandrapur : समृद्धी महामार्गाचा विकास महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांच्या सीमेवर वसलेल्या चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांपर्यंत होणार आहे. पोंभूर्णा एमआयडीसीसारख्या विकासात्मक उपक्रमांमुळे या भागातील उद्योग क्षेत्रांना विकासाचे पंख लागणार आहेत. आगामी काळात स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण होतील. त्यामुळे उद्योग विश्वाच्या गरजांनुसार आवश्यक कौशल्य व संसाधनांचे प्रशिक्षण देऊन स्थानिकांना रोजगारात प्राधान्य द्यावे, असे निर्देश राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात नियोजन भवन सभागृहात नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत आमदार मुनगंटीवार बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, गोंडपिपरीच्या उपविभागीय अधिकारी लघिमा तिवारी, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्या गुरनुले. कामगार मोर्चाचे प्रदेश महामंत्री अजय दुबे, भाजप महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, रामपाल सिंग, सुरज पेदुलवार, प्रज्वलंत कडू, नम्रता ठेमस्कर आणि विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Ashok nete: सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राची मान उंचावली !
बैठकीत आमदार मुनगंटीवार म्हणाले, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी भविष्यातील गरजांचा वेध घेऊन कोणत्या प्रकारचे प्रशिक्षीत मनुष्यबळ आवश्यक आहे, याचा अंदाज घ्यावा. त्यानुसार विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण कोणत्या आधुनिक यंत्रसामग्रीवर व्हावे, हे निश्चित करावे. तसेच कंपन्यांनी सीएसआर निधीतून काही आवश्यक टुल्स व यंत्रसामग्री खरेदी करून उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून प्रशिक्षणाची गुणवत्ता अधिक प्रभावीपणे वाढवता येईल.
चंद्रपूर जिल्ह्यात आचार्य चाणक्य कौशल्य विभागाची पाच केंद्रे आहेत. आयटीआयमधून अप्रेंटिससाठी विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रात कसे पाठवता येईल, याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी. प्राचार्य व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा करावा. जिल्ह्यातील १६ आयटीआय उद्योगांनी दत्तक घ्याव्या. बल्लारपूर पेपर मिलने एसएनडीटी विद्यापीठाच्या उपकेंद्रासोबत प्रशिक्षणासाठी करार करावा, असे आमदार मुगंटीवार यांनी सुचवले.
Maratha movement : जरांगेंनी आदेश द्यावा; एका तासात मुंबई बंद करू !
उद्योग क्षेत्रासोबत समन्वय साधण्यासाठी उद्योग राज्यमित्र चंद्रपुरात आयोजित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील उद्योगांनी आवश्यक मनुष्यबळाची मागणी कळवल्यास त्या अनुषंगाने संबंधित दर्जाचे प्रशिक्षण देणे शक्य होईल. या माध्यमातून तांत्रिक कौशल्य प्राप्त तरूणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, असेही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.








