Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवारांच्या पुढाकारातून साकारलेले ३.९३ कोटींचे राणी हिराई उमेद मार्ट लोकार्पित

chandrapur-sudhir-mungantiwar-women-self-help-group-bhavan : महिला बचत गट भवनामुळे महिलांच्या स्वावलंबनाला नवी दिशा

Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेले सुसज्ज महिला बचत गट भवन लोकार्पित करण्यात आले आहे. सुमारे ३.९३ कोटी रुपये खर्चून साकार झालेल्या या इमारतीमुळे जिल्ह्यातील महिला बचत गटांना आता स्वतंत्र, सुरक्षित आणि सर्व सुविधा असलेले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी ही इमारत महत्त्वाची ठरणार आहे.

महिला बचत गटांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने राज्याचे माजी वने, सांकृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार आ. सुधीर मुनगंटीवार यांनी या भवनासाठी निधी मंजूर करण्यासाठी विशेष पाठपुरावा केला. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना 2022-23 अंतर्गत या कामाला प्रशासकीय मान्यता मिळवून देण्यात आली. त्यानंतर ज्युबिली हायस्कूल परिसरात हे आधुनिक भवन उभारण्यात आले आहे. तांत्रिक मान्यता नोव्हेंबर 2023 मध्ये मिळाल्यानंतर फेब्रुवारी 2024 मध्ये कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला होता.

Sudhir Mungantiwar : चंद्रपूरच्या विकासाचा ‘मुनगंटीवार पॅटर्न’; शिक्षण, आरोग्य आणि रोजगारावर ठोस भूमिका

या महिला बचत गट भवनामुळे बचत गटांना बैठका, प्रशिक्षण शिबिरे, कार्यशाळा तसेच विविध सामाजिक आणि आर्थिक उपक्रम राबविण्यासाठी एक सुसंगत केंद्र मिळाले आहे. विशेष म्हणजे या भवनात सुरू करण्यात आलेल्या राणी हिराई  उमेद मार्टमुळे महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना थेट बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. यामुळे महिलांना त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री करण्याची संधी मिळून आर्थिक स्वावलंबनाला मोठे बळ मिळणार आहे.

या उपक्रमाबाबत परिसरातील आणि जिल्ह्यातील महिला बचत गटांनी समाधान व्यक्त केले असून, निधी मंजुरीसाठी आणि पायाभूत सुविधा उभारणीसाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत. महिलांना सक्षम करण्यासाठी आवश्यक असलेली जागा, प्रशिक्षण आणि बाजारपेठ या तिन्ही गोष्टी एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने महिलांच्या उद्यमशीलतेला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Sudhir Mungantiwar ; आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे पोंभुर्णा ग्रामीण रुग्णालयातील पाणीटंचाईवर तोडगा

महिलांच्या सक्षमीकरणासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यापूर्वीही विविध योजना आणि उपक्रम राबविले आहेत. बचत गटांना आर्थिक बळ मिळावे, त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांचे उत्पादन बाजारात पोहोचावे, यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यावर त्यांनी सातत्याने भर दिला आहे. महिला बचत गट भवन आणि राणी हिराई मार्टसारख्या उपक्रमांमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची नवी दिशा मिळत असल्याचे चित्र आहे.