Breaking

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी १५ कुटुंबांना मिळवून दिली सव्वा कोटीची नुकसान भरपाई !

Compensation of Rs. 1.5 crore was provided to 15 encroachments. : पटेल नगरमधील १५ अतिक्रमणधारकांना मिळणार मोबदला

Chandrapur : केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त धोरणांतर्गत नागरी प्रकल्पांसाठी आवश्यक शासकीय जमिनींवरील अतिक्रमाणांबाबत ठोस निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार ज्या अतिक्रमधारकांनी वास्तव्यासाठी बांधकाम केले आहे, त्यांना प्रत्येकी ८.४० लाख रुपये दिले जाणार आहेत. यामध्ये रेल्वे अधिग्रहणासाठी चंद्रपूरच्या पटेल नगरमधील १५ अतिक्रमण धारकांना मोबदला मिळणार आहे. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने प्रयत्न केले.

पटेल नगरमधील १५ घरवाल्यांना रेल्वे अधिग्रहणाच्या माध्यमातून ८ लाख ४६ हजार याप्रमाणे एकूण १ कोटी २६ लाख ९० हजार रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. यासाठी आमदार मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत दोन बैठका घेतल्या. त्याशिवाय राज्य सरकारकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्यामुळे हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुले पटेल नगरमधील १५ कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.

River cleaning : मिठी नदीत बुडाले आदित्य ठाकरे !

आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात बैठक घेऊन राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे पाठपुरावा केला. यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्रव्यवहार करत सर्व १५ कुटुंबांना मोबदला मिळण्याची मागणी केली. आमदार मुनगंटीवार यांच्या मागणीची दखल घेत मोबदला देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या नागरी भागातील पुनर्वसनाच्या प्रयत्नांना गती मिळणार आहे. सातत्यपूर्ण पाठपुराव्याबद्दल नागरिकांनी आमदार मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.