CSR should also include responsibility for environmental conservation : ‘ब्रँड ऑफ द इयर’ शिखर परिषदेत माजी वनमंत्री आमदार मुनगंटीवार यांचे आवाहन
Mumbai: पूर्वी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी CSR ऐच्छिक होती. आता त्यात सगळे योगदान देत आहेत. मात्र आता कॉर्पोरेट पर्यावरणविषयक – इन्व्हरमेंट रिस्पॉन्सिबिलिटी पण स्वीकारायला हवी, असे आवाहन माजी वने व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. टीम मार्क्समेन आयोजित टाइम्स नाऊ आणि बिझनेस स्टँडर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील सहारा हॉटेल येथे “ब्रँड ऑफ द इयर २०२५” या शिखर परिषदेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
शिखर परिषदेत प्रतिष्ठित ब्रँड्सच्या प्रमुखांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ‛इन फोकस’ या मॅगझीनचे प्रकाशन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आर. गोपालकृष्णन (माजी कार्यकारी संचालक, टाटासन्स), प्रिधी गुप्ता (सीएमओ, एसईडब्ल्यू.एआय), ललातेंदू पांडा (सीनियर व्हीपी आणि बिझनेस हेड, जिओमार्ट) आणि वनिता केशवानी (सीईओ, मॅडिसन वर्ल्ड) आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
Sudhir Mungantiwar : लोकशाहीची हत्या करणारी काँग्रेसी वृत्ती नष्ट करण्याचा संकल्प करावा
यावेळी मुनगंटीवार म्हणाले, ‘काळानुरूप बदल केला तर नक्कीच ब्रँड प्रस्थापित करता येतो. नवोन्मेष नेतृत्व आणि सर्वोत्तम ब्रँड्सच्या या उत्सवातून, पुरस्कार प्राप्त ब्रँड्स भारताला उद्योग क्षेत्रात निश्चितच पुढे घेऊन जातील हा विश्वास आहे.’ ब्रँड संदर्भात उदाहरण देताना त्यांनी सांगितले की ‘जपानमध्ये एखादे प्रॉडक्ट 99.99% कॉलिटी चे असेल तरी ते रिजेक्ट केले जाते. तिथे 100 टक्के चांगली गुणवत्ता अनिवार्य आहे. त्यामुळे ते जगात सर्वात पुढे आहेत.’
जर्मनीमध्ये सुई बनवणाऱ्या एका कारखान्यात एकदा एक मंत्री भेट देण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांनी एक सुई हातात घेऊन पाहिली. तर त्या मालकाने त्या सुईचा पूर्ण ट्रे रिजेक्ट केला. जेव्हा त्यांना या संदर्भात विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की, त्या सुईला तुमच्या बोटाचा घाम लागला असेल आणि त्यामुळे ती सुई खराब झाली किंवा गंजली तर माझे सोडा माझ्या देशाचे नाव खराब होईल. त्यामुळे मी संपूर्ण ट्रे रिजेक्ट केला.
Sudhir Mungantiwar : पोंभुर्णा तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत करा, अन्यथा जनआंदोलन उभारू
एखाद्या प्रॉडक्ट बद्दल किती सतर्क असावे याचे हे उत्तम उदाहरण आहे. सगळ्यात चांगली जाहिरात कोणती या विषयावर खूप मते येतील पण आम्हाला शिकवले होते की, आपले प्रॉडक्ट एखादा माणूस दुसऱ्याला स्वतः समजवून सांगतो ही खरी जाहिरात. हे उदाहरण देऊन त्यांनी एखाद्या प्रॉडक्टसाठी किती सतर्कता बाळगायला हवी हे स्पष्ट केले.
Sudhir Mungantiwar : ‘धन्यवाद सुधीरभाऊ… तुमच्यामुळेचं आमच्या संघर्षाला न्याय मिळाला!
देशगौरव पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात आता भारताने ‘जय जवान जय किसान जय विज्ञान’ याच्यासोबत ‘ जय अनुसंधान’ असा नारा दिला आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. आपण आयातीवरचे अवलंबित्व कमी करत आहोत. भारतीय अर्थव्यवस्था मोठी प्रगती करत आहे. महाराष्ट्र देखील या प्रगतीत आपले योगदान देत आहे. महाराष्ट्र ‘इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन्स’ बनत आहे. सरकारकडून तुम्हाला अडचणी असतील, तर तुमचा प्रतिनिधी म्हणून त्या सोडवण्याकरता मी पुढाकार घेईल, असा विश्वासही मुनगंटीवार यांनी उपस्थितांना दिला.
Sudhir Mungantiwar : ‘ठेंगणें’नी ठेवला विनंतीचा मान, अन् मुनगंटीवारांनी केले त्यांना ‘आभाळ ठेंगणे’
ते म्हणाले, 2 टक्के सीएसआर पैकी किमान 0. 25 टक्के तरी पर्यावरण विषयासाठी खर्च व्हावेत अशी माझी अपेक्षा आहे. मी यासंदर्भात पंतप्रधान श्री. मोदीजींशी चर्चा करणार आहे. चांगले वातावरण, चांगले पर्यावरण आणि वायू बदल या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी तोच एक मोठा पर्याय आहे. हे सांगत भविष्यात पर्यावरणाच्या क्षेत्रात कॉर्पोरेट मदत करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.