Breaking

Sudhir Mungantiwar : लोकतंत्र सेनानींनी गाठले चंद्रपूर अन् दिले मुनगंटीवारांना आशीर्वाद !

Democracy fighters reached Chandrapur and blessed Mungantiwar : कुटुंबातील ज्येष्ठांप्रमाणे हातावर ठेवला खाऊ

Chandrapur : न्याय मागण्यासाठी सहसा कुणाला सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे जावे लागत नाही. राजकारण आणि समाजकारण करताना ते लोकांच्या समस्या हेरतात आणि स्वतःहून पुढाकार घेत त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करतात. याचा अनुभव भारतीय लोकशाहीच्या रक्षणासाठी तुरुंगवास भोगलेल्या लोकतंत्र सेनानींना आला. राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिसानिमित्त हे सेनानी चंद्रपुरात आले. अन् मुनगंटीवारांना शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले.

लोकतंत्र सेनानींच्या मानधनाच्या प्रश्नाबाबत अडचण आमदार मुनगंटीवार यांच्या लक्षात आली आणि त्यांनी हा मुद्दा सभागृहात उचलून धरला.लोकतंत्र सेनानींना दरमहा २० हजार रुपये मानधन देण्याची मागणी त्यांनी लाऊन धरली. यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला. या संघर्षाला यश आले आणि सरकारने लोकतंत्र सेनानींना २० हजार रुपये मानधन सुरू केले. यानंतर मुनगंटीवारांच्या वाढदिवशी या सेनानींचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघर्षव्रतींनी आमदार मुनगंटीवार यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली आणि वाढदिवसानिमित्त चंद्रपुरात येऊन प्रत्यक्ष भेट घेऊन शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. कुटुंबातील ज्येष्ठांप्रमाणे त्यांच्या हातावर खाऊ ठेवला. हा क्षण अनुभवताना स्वतः आमदार मुनगंटीवार भारावून गेले.

Sudhir Mungantiwar : स्वातंत्र्य दिन सोहळ्यात लोकतंत्र सेनानींना सन्मानपूर्वक निमंत्रण द्यावे

याप्रसंगी लोकतंत्र सेनानी संघाचे महासचिव विश्वास कुलकर्णी (जळगाव), प्रदीप ओगले (सांगली), अरुण भिसे व पांडुरंग झिंझुरडे (यवतमाळ) या सर्व लढवय्यांना भेटून मन अंतःकरणापासून भारावून गेले. या निःस्वार्थ सेनानींच्या समर्पणाला माझा शतशः सलाम.त्यांना न्याय देण्याची संधी मिळणे, हेच माझ्या आयुष्याचं खऱ्या अर्थाने सर्वात मोठं भाग्य समजतो, अशी भावना आमदार मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

Thrill of kidnapping :राजकीय वैमनस्यातून अपहरणाची थरारक घटना !

लोकतंत्र सेनानींच्या मानधनाचा मुद्दा सरकारच्या लक्षात आणून देणे हे केवळ आमदार मुनगंटीवार यांच्यामुळेच शक्य झाले. त्यांनी दिलेल्या निवेदनावर कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यामुळेच दरमहा २० हजार रुपये मानधन मिळण्याचा निर्णय पुर्णत्वास आला. आणीबाणीमध्ये लोकशाहीच्या रक्षणासाठी समर्पितपणे लढणाऱ्या सेनानींसाठी आमदार मुनगंटीवार यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. या शब्दांत लोकतंत्र सेनानी संघाने आमदार मुनगंटीवार यांचे आभार मानले.