Sudhir mungantiwar : स्थानिकांवर अन्याय खपवून घेतला जाणार नाही, मुनगंटीवारांचा वेकोली प्रशासनाला दम

ekona-mines-bhadravati-workers-reinstatement-sudhir-mungantiwar-directives : एकोणा माईन्समधील स्थानिक कामगारांना तातडीने कामावर घेण्याचे मुनगंटीवारांचे निर्देश

Chandrapur : भद्रावती तालुक्यातील एकोणा माईन्स येथे गेल्या आठ महिन्यांपासून स्थानिक कामगारांना कामापासून दूर ठेवले आहे. रोजगारच नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबांवर संकट आले आहे. उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अश्यात राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी वेकोली प्रशासनाची झाडाझडती घेतली आहे. या सर्व कामगारांना तातडीने कामावर घेण्याचे निर्देश देतानाच स्थानिक कामागारांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराच मुनगंटीवारांनी वेकोली प्रशासनाला दिला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील २० कलमी सभागृहात आयोजित बैठकीत मुनगंटीवारांनी प्रशासनाची कठोर शब्दांत कानउघाडणी केली. गेल्या आठ महिन्यांपासून रोजगारापासून वंचित कामगारांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे मुनगंटीवारांनी नमूद केले. हा केवळ औद्योगिक किंवा तांत्रिक विषय नसून शेकडो कुटुंबांच्या आयुष्याशी निगडित प्रश्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक कामगारांना डावलून बाहेरील मजुरांना प्राधान्य देण्याच्या प्रकाराकडे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Property tax exemption : मोठा निर्णय! मुंबईत 700 चौ. फूटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी

बैठकीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. कामगारांना कामावरून दूर ठेवण्यामागील कारणे, कराराच्या अटी आणि प्रशासकीय प्रक्रिया याबाबत सविस्तर चर्चा झाली. मात्र, कोणत्याही कारणाने स्थानिक कामगारांवर अन्याय होऊ देणार नाही, असा ठाम इशारा आमदार मुनगंटीवार यांनी दिला. सर्व जुन्या कामगारांना विनाविलंब कामावर रुजू करून त्यांच्या प्रलंबित प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

या आक्रमक भूमिकेमुळे कामगारांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासन आणि कंपनीकडून लवकरात लवकर सकारात्मक कार्यवाही होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. संबंधित निर्णयाची अंमलबजावणी कधी आणि कशा पद्धतीने होते याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Piyush Goel : केंद्रीयमंत्री पीयूष गोयलने यांनी मागितली स्फोटाची माहिती, संबंधित अधिकारीसुद्धा येणार गोत्यात

स्थानिकांना डावलले तर याद राखा
भद्रावती तालुक्यातील एकोणा माईन्समध्ये स्थानिक कामगारांवर झालेला अन्याय कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट आणि कडक इशारा भाजपाचे ज्येष्ठ नेते आ.सुधीर मुनगंटीवार यांनी वेकोली प्रशासनाला दिला. तब्बल आठ महिन्यांपासून स्थानिक कामगारांना कामापासून दूर ठेवण्याच्या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त करत, “स्थानिकांना डावलून बाहेरील मजुरांना प्राधान्य देण्याची ही पद्धत त्वरित थांबवा आणि सर्व कामगारांना तातडीने पुन्हा कामावर घ्या,” असे ठणकावून सांगत मुनगंटीवार यांनी प्रशासनाची जोरदार कानउघाडणी केली.