Breaking

Sudhir Mungantiwar : ‘धन्यवाद सुधीरभाऊ… तुमच्यामुळेचं आमच्या संघर्षाला न्याय मिळाला!

Emergency fighter thanked Mungantiwar for the increase in honorarium : मानधन वाढीनंतर लोकतंत्र सेनानींनी व्यक्त केली कृतज्ञता

Chandrapur: धन्यवाद सुधीरभाऊ… आम्हाला कुणी विचारलं नव्हतं, पण तुम्ही आमचा आवाज विधानसभेत पोहोचवला. तुमच्यामुळे आम्हाला न्याय मिळाला, अशा शब्दांत लोकतंत्र सेनानींनी कृतज्ञता व्यक्त केली.

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर येथील जनसंपर्क कार्यालयात, लोकतंत्र सेनानींनी मुनगंटीवार यांचा सत्कार केला. यावेळी त्यांनी मोठ्या आनंदात त्यांना वाढीव पेन्शन मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सर्वांच्या वतीने भावना व्यक्त करताना सेनानींनी सांगितले की सुधीर भाऊ कायमच गोर गरीब आणि पीडितांच्या प्रश्नावर काम करतात. समाजातील सगळ्या स्तरातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतात. त्यांच्या पुढाकारामुळेच आमच्या मागण्या सरकार दरबारी पोहोचल्या. आणि हा मानधन वाढीचा निर्णय झाला.

Sudhir mungantiwar: मुनगंटीवारांचा निर्णायक पाठपुरावा; लोकतंत्र सेनानींच्या सन्मान निधीला दरमहा २० हजारांची मंजूरी

सुधीर भाऊमुळे आमचा लढा व्यर्थ गेला नाही, याचा फार आनंद झाला.. या सत्काराला उत्तर देताना सुधीर मुनगंटीवार यांनी सर्वांचे आभार मानून, मी तुमच्यासोबत आहे आपल्या राहिलेल्या मागण्याही मान्य करून घेण्यासाठी प्रयत्न करेल असे आश्वासन दिले. तेव्हा उपस्थित सेनानींनी टाळ्या वाजवून स्वागत केले.

आणीबाणीच्या काळात कुटुंबाचा आणि स्वतःचा जराही विचार न करता केवळ “राष्ट्र सर्वोपरी” म्हणून देशासाठी कारावास भोगून संघर्ष करणाऱ्या लोकतंत्र सेनानींना दरमहा २० हजार रुपये सन्मान निधी मिळावा, यासाठी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत आवाज बुलंद केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली होती.

Sudhir Mungantiwar : 66 वर्षांच्या तुलनेत 11 वर्षांत 5 पट अर्थसंकल्पीय वाढ

राज्याच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.आ. मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळेच हे शक्य झाले, या शब्दांत लोकतंत्र सेनानींनी त्यांचे आभार मानले आहेत. एका अत्यंत संवेदनशील विषयामध्ये स्वतः लक्ष घालून मुनगंटीवार यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर ४ हजार १०३ लोकतंत्र सेनानींना न्याय मिळाला आहे.*