Breaking

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांच्या पुढाकारामुळे कोळसा खाण क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी समिती स्थापन !

 

Farmers in coal mining areas of Chandrapur and Yavatmal districts will get compensation : योग्य कार्यवाहीसाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याचे शासनाचे आदेश

Chandrapur : वेकोलिच्या (वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड) कोळसा खाणींमुळे चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतींचे आजवर मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी ओरडून ओरडून थकले. पण त्यांचा आवाज कुणी ऐकला नाही. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नेहमीच संवदेनशील असलेले राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांची व्यथा ऐकली आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कंबर कसली. वेकोलिमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

आमदार मुनगंटीवार यांनी सभागृहातही या समस्येला वाचा फोडली. शेवटी त्यांच्या प्रयत्नांची दखल सरकारने घेतली आणि एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. कोळसा उत्खणनामुळे झालेल्या नुकसानाच्या पंचनाम्यांसह शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती स्थापन करण्याचे आदेश शासनाने ३१ जुलै २०२५ रोज दिले. ही समिती नुकसान भरपाई संदर्भातील सुधारित धोरण निश्चित करणार आहे. आमदार मुनगंटीवार यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याचे हे फलित आहे.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचे प्रयत्न यशस्वी, शेतकऱ्यांना पिक विमा नोंदणीसाठी 14 ऑगस्टपर्यंत करता येणार अर्ज !

कोळसा उत्खननामुळे झालेल्या नुकसानाचे वास्तव आमदार मुनगंटीवार यांनी मांडले होते. वेकोलिच्या कोळसा वाहतुकीच्या धुळीने व खाण क्षेत्रातील स्फोटांमुळे शेतजमिनीचे होत असलेले नुकसान तसेच पिकांच्या उत्पन्नात घट झाल्यामुळे झालेले नुकसान अधोरेखीत करण्यात आले होते. शासनाने तातडीने दखल घेत मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. ही समिती आवश्यक ते धोरण तयार करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार आहे.

Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवारांच्या मागणीवरून सरकारने घेतला ठोस निर्णय !

शेतकरी हितासाठी सातत्याने आवाज उठवणारे, त्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवणारे आणि प्रशासनाकडून तातडीची कृती घडवून आणणारे आमदार सुधीर मुनगंटीवार हे या निर्णयाच्या केंद्रस्थानी राहिले. मुनगंटीवार यांची शेतकऱ्यांप्रती असलेली बांधिलकी, तळमळ आणि संवेदनशील दृष्टीकोन पुन्हा एकदा अधोरेखीत झाला. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच शेतकऱ्यांच्या या लढ्याला शासनमान्यता मिळाली आहे.