Breaking

Sudhir Mungantiwar : इरई नदीसाठी पालकमंत्री उईके आणि मुनगंटीवारांनी दिला आपला पगार !

Guardian Minister Uike and Mungantiwar donated their salaries for the Irai River : शासकीय कर्मचाऱ्यांनीही दिला एक दिवसाचा पगार

Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यातील झरपट नदी असो किंवा इरई नदी, निसर्गाचे रक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे म्हणत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार सर्वप्रथम नदी संवर्धनासाठी सरसावले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि आजपासून इरई नदीच्या खोलीकरण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

राज्याचे आदिवासी विकास आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते आज (२५ एप्रिल) शुभारंभ सोहळा पार पडला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांच्यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचा एक कॉल अन् मूल बसस्थानकावर उपलब्ध झाले शुद्ध, थंड पाणी !

आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, पालकमंत्री अशोक उईके यांच्या नेतृत्वात इरई नदी खोलीकरणाची सुरुवात होत आहे. संपूर्ण जिल्ह्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे. शासकीय यंत्रणा उत्स्फूर्तपणे हे अभियान राबवेल, यात शंका नाही. कर्मचाऱ्यांनी या अभियानासाठी एक दिवसाचा पगार दिला आहे. पालकमंत्र्यांनी एक महिन्याचा पगार आणि मिळणारे भत्ते अशी रक्कम दिली आहे. मी सुद्धा एक महिन्याचा पगार देत आहे. ज्या भावनेने इरई नदीच्या कामाला सुरुवात झाली, हीच भावना राज्यभर निर्माण झाली. तर राज्यातील सर्व नद्यांचं रुपडं पालटल्याशिवाय राहणार नाही.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांना विद्यार्थ्यांची चिंता, जिल्हाधिकाऱ्यांना सांगून तात्काळ बदलवल्या शाळेच्या वेळा

 

‘चला जाणुया नदीला..’, हे अभियान आपण जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनात राज्यभर सुरू केले होते. इरई नदी ८१ किलोमीटर लांबीची आहे. त्यापैकी १७ किलोमीटर अंतराच्या खोलीकरणासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे आहे. ओव्हरबर्डन साचल्यामुळे स्वतंत्र उपाययोनेची गरज असल्याचे आमदार मुनगंटीवार म्हणाले.

Sudhir Mungantiwar : आमदार मुनगंटीवारांनी केला लोकतंत्र सेनानींचा आवाज बुलंद !

जमिनीवर पडलेल्या पाण्याला थांबायला लावा, थांबलेल्या पाण्याला जमिनीत जिरवा. पावसाच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन करणे आवश्यक आहे. चंद्रपूरमध्ये पावसाचे प्रमाण सरासरी ११०० मिमी आहे. त्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. साबरमतीमध्ये आधुनिक रिव्हर फ्रंट आहे, तसाच चंद्रपूमध्येही विकसीत करण्याचा संकल्प केला आहे. येणाऱ्या काळात सरकार चंद्रपूरसाठी रिव्हर फ्रंटला मान्यता देईल, असा विश्वास आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.