Sudhir Mungantiwar : शेतकऱ्यांचे दुःख दूर करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांच्या तत्परतेला यश

Help immediately provided to farmers whose bullocks died due to lightning : वीज पडून बैलांचा मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मिळवून दिली मदत

Ballarpur : दिवसभर शेतात राबून जगाचे पोट भरणाऱ्या शेतकऱ्यावर संकट कोसळले अन् आ. मुनगंटीवार धावून गेले नाहीत, असे होणे नाही. जगाचा पोशिंदा दुःखात आहे हे कळल्यावर नेहमीप्रमाणे राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चक्र फिरवले आणि मदत मिळवून दिली. आयुष्यभर मातीची मशागत करणाऱ्या शेतकऱ्याच्या जगण्याचे सोने करण्याचा ध्यास आ. मुनगंटीवार यांनी घेतला आहे, याची पुन्हा प्रचिती आली.*

बल्लारपूर तालुक्यातील मौजा हडस्ती, आसेगाव, कोठारी आणि कळमना येथील शेतकऱ्यांवर आभाळ कोसळलं. वीज कोसळून बैल जागीच मृत्युमुखी पडले. कष्टाचा साथीदार गमावल्याने त्यांच्यावर आर्थिक आणि मानसिक आघात झाला. पुन्हा जिद्दीने उभे होण्याचे अवसानच गळून पडले. पण या दुःखावर एक मात्रा शोधण्याचे काम राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

Sudhir Mungantiwar : ‘आ. सुधीर मुनगंटीवार हे शेतकऱ्यांचे खरे कैवारी’

शेतकरी हवालदिल झाल्याची माहिती कळताच त्यांनी तात्काळ दखल घेतली. प्रशासनाला नुकसानग्रस्त शेतकऱ्याला त्वरित आर्थिक मदत देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आणि १३ ऑगस्ट रोजी, बल्लारपूर येथे, आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते चारही शेतकऱ्यांना प्रमाणपत्र प्रदान करून आर्थिक मदत वितरित करण्यात आली. कोठारी गावचे दत्तू माधव काळे यांचा एक बैल वीज कोसळून मृत्यूमुखी पडला. त्यांना ३२ हजार रुपयांची मदत मिळाली आहे. तर हडस्ती गावचे सुनिल नामदेव खोके यांचे दोन बैल मृत्यूमुखी पडले. त्यांना शासनातर्फे ६४ हजार रुपयांची मदत मिळाली. आसेगाव येथील कैलाश परशुराम कुळमेथे व कळमणा येथील हरीश्चंद्र झाडे यांच्याही शेतातील प्रत्येकी एक बैल मृत्यूमुखी पडला. त्यांनाही प्रत्येकी ३२ हजार रुपयांची मदत मिळाली. हे केवळ आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे शक्य झाले अशी भावना व्यक्त करीत या शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

Harshvardhan Sapkal : ‘कबुतर जिहाद’ भाजप सरकारचे पाप

आ. मुनगंटीवार यांनी दाखवलेली ही तत्परता, शेतकऱ्यांप्रती असलेली आपुलकीची जाणीव आणि प्रशासनाला दिलेले स्पष्ट निर्देश त्यांच्या संवेदनशील मनाचे दर्शन घडविणाऱ्या घटना आहेत. शेतकऱ्यांचे अश्रू पुसताना केवळ सांत्वन करून काम होत नाही, तर त्याला प्रत्यक्ष कृतीचीही गरज असते. तात्काळ आर्थिक मदत मिळवून देत या संवेदनशीलतेला आ. श्मुनगंटीवार यांनी कृतीची जोड दिली. त्याचेच हे फलित असल्याची भावना व्यक्त होत आहे. ‘शेतकऱ्याच्या दुःखात सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहण्यात आघाडीवर असलेले नेते म्हणजे आमदार श्सुधीरभाऊ मुनगंटीवार आहेत,’ अशी उत्स्फूर्त भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.