Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंच्या कार्यशैलीवर प्रभावित होऊन युवा जिल्हाध्यक्षाची भाजपमध्ये दमदार एन्ट्री!

Impressed by Sudhirbhau’s dynamic working style, the Youth District President makes a powerful entry into the BJP : गोरगरिबांची सेवा करण्याचे आवाहन

Chandrapur : आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रभावी कार्यशैलीवर प्रेरित होऊन चंद्रपूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला मोठी राजकीय बळकटी लाभली आहे. गोंडवाना गणतंत्र पक्षाचे ग्रामीण युवा जिल्हाध्यक्ष व माजी सरपंच श्री. गणपतजी नैताम यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. हा पक्षप्रवेश समारंभ चंद्रपूर येथील आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडला.

जनतेच्या प्रश्नांप्रती संवेदनशीलता आणि विकासाला केंद्रस्थानी ठेवणारी कार्यशैली हाच सुधीरभाऊंच्या नेतृत्वाचा पाया आहे. त्यांच्या पुढाकारातून चंद्रपूर जिल्ह्यात पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि सांस्कृतिक प्रगतीची अनेक कामे झाली आणि आताही सुरू असून, त्याच दृष्टीकोनातून अनेक तरुण नेते आज भाजपच्या विचारधारेशी जोडले जात आहेत.

Sudhir mungantiwar : मुनगंटीवारांची झोपडपट्टीतील चिमुकल्यांसोबत दिवाळी

यावेळी निंबाळा ग्रामपंचायत सदस्य सौ. वैशालीताई नैताम, सौ. अर्चनाताई कोटरंगे, श्री. हरीदास निकुरे, माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीमती अर्चनाताई नैताम, सौ. अहिल्याताई किन्नाके तसेच बोर्डा जिल्हा परिषद क्षेत्रातील गोंडवाना गणतंत्र पक्षाचे अनेक कार्यकर्तेही भाजपमध्ये दाखल झाले. सर्वांना भाजपचा दुपट्टा टाकून आ.सुधीर मुनगंटीवार यांनी स्वागत केले.

गणपत रघुनाथ नैताम हे निंबाळा येथील माजी सरपंच असून, गोंडवाना गणतंत्र पक्षाच्या युवा संघटनेत ग्रामीण जिल्हा पातळीवर कार्यरत होते. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले, “आमदार आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या विकासकामांमुळे आणि चंद्रपूर तालुक्यातील भाजपच्या कार्यपद्धतीमुळे मी प्रभावित झालो आहे. आमचे तालुका पदाधिकारी श्रीनिवास जंगमवार, जगताप तसेच माझे निकटचे मित्र प्रदीप कोटरंगे यांच्या माध्यमातून आज मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे. आता समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि गावोगाव विकासाला चालना देण्यासाठी आम्ही कार्यरत राहू.”

Sudhir Mungantiwar : आ. मुनगंटीवार यांनी नातीसोबत ‘किलबिल’ येथील निराधार चिमुकल्यांसह साजरी केली दिवाळी

या कार्यक्रमात बोलताना आ.सुधीर मुनगंटीवार यांनी नव्या कार्यकर्त्यांचं स्वागत करत म्हणाले, “भाजप हा फक्त पक्ष नसून एक कुटुंब आहे. आमचं उद्दिष्ट फक्त निवडणुका जिंकणं नाही, तर लोकांची मनं जिंकणं हेच आमचं खरं ध्येय आहे. गोरगरिबांच्या सेवेसाठी, समाजाचा उद्धारासाठी आणि गावोगाव विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावं, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Sudhir Mungantiwar : उमरी पोतदार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण

या पक्षप्रवेश कार्यक्रमाला श्रीनिवास जंगमवार, हनुमान काकडे, देवानंद थोरात यांसह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या विकासाभिमुख नेतृत्वामुळे चंद्रपूर जिल्ह्यात भाजपची पकड अधिक मजबूत होत असल्याचं या प्रवेशामुळे स्पष्ट झालं आहे.