Sudhir Mungantiwar : आणीबाणीत कारावास भोगणाऱ्यांचा सन्मान निधी वाढवा!

 

Increase the honor fund for those imprisoned during the emergency : आमदार सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Mumbai आणीबाणीच्या काळात कुटुंबाचा आणि स्वतःचा जराही विचार केला नाही. केवळ “राष्ट्र सर्वोपरी” म्हणून देशासाठी, जनहित हेच कर्तव्य मानत करावास भोगला. घरावर तुळशीपत्र ठेवून देशासाठी संघर्ष करणाऱ्या लोकतंत्र सेनानींच्या सन्मान निधित भरीव वाढ करावी. अशी मागणी बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार व भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांना निवेदनाद्वारे केली.

यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांना त्यांनी निवेदन दिले आहे. यामध्ये मुनगंटीवार यांनी राजस्थान सरकारच्या निर्णयाचा दाखला दिला आहे. आणीबाणीमुळे देशाच्या लोकशाहीचे महत्त्व लक्षात घेऊन लोकतंत्र सेनानी म्हणून ज्यांनी करावास पत्करला त्या सर्व लोकतंत्र सेनानींचा सन्मान करणे ही शासनाची जबाबदारी आहे, असं ते निवेदनात म्हणाले आहेत.

अतिशय हालअपेष्टा सहन करत “भारत माता की जय” म्हणत या लोकतंत्र सेनानींनी निरपाराध असूनही हृदयामध्ये राष्ट्रभक्तीचा भाव घेऊन आणीबाणीमध्ये हाल सहन केले. या लोकतंत्र सेनानींनी हे हाल सहन केले नसते, संघर्ष केला नसता तर कदाचित लोकशाही मानणाऱ्या देशाचा हुकूमशाहीकडे प्रवास झाला असता, असंही मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

Sudhir Mungantiwar : सर्व घटकांना सामावून घेणारा लोकाभिमुख अर्थसंकल्प  

सरकारने लोकतंत्र सेनानी सन्मान म्हणून पेन्शन राशी 20 हजार रुपये केली आहे. तसेच आरोग्य चिकित्सा सहाय्य म्हणून 4 हजार रुपयांची राशी दर महिन्याला राजस्थानात दिली जाते. महाराष्ट्रात सध्यस्थितीत 4 हजार 103 स्वातंत्र्य सेनानी सन्मान निधीस पात्र आहेत, हेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

Sudhir mungantiwar : फुले दाम्पत्याला भारतरत्न देण्याचा ठराव संमत होणार !

राजस्थान सरकारची अधिसूचना लक्षात घेऊन महाराष्ट्रात देखील हा सन्मान निधी वाढविण्यासाठी स्वतः पुढाकार घ्यावा अशी विनंती आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सदर निवेदनाद्वारे केली आहे.