Kudos to Kisan Morcha District President Bandu Gaurkar : किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बंडू गौरकार यांचे गौरवोद्गार
Chandrapur : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांना बोनस मिळवून देण्यासाठी विधानसभेत आवाज बुलंद करत शासनाकडे सतत पाठपुरावा केला. त्यामुळेच शेतकऱ्यांना बोनस मिळाला आहे. आ. मुनगंटीवार हे कायम शेतकऱ्यां संदर्भात संवेदनशील आहेत. ते शेतकऱ्यांचे कैवारी आहेत, अशी उत्स्फूर्त भावना चंद्रपूर किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बंडू गौरकार यांनी व्यक्त केली.*
आ. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बोनस मिळवून देण्यासाठी विधानसभेत प्रभावी पाठपुरावा केल्यामुळे शासनाने निर्णय केला. त्याबद्दल आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा आज भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा, चंद्रपूर जिल्हा वतीने सत्कार करण्यात आला. किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बंडू गौरकार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमात ओम पवार, प्रमोद कळस्कर, अनिल मोरे, पलींद्र सातपुते, अनुप निरलवार, विवेकजी ठिकरे, नरेंद्र आमने किसान मोर्चाचे सर्व पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष बंडू गौरकार म्हणाले, “शेतकऱ्यांचे खरे कैवारी म्हणजे आमदार सुधीर मुनगंटीवार आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी ते नेहमीच लढा देतात. पालकमंत्री असताना जिल्ह्यासाठी विक्रमी २०२ कोटी रुपये पीक विम्याचे मंजुर केले. कायम शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी अखंड प्रयत्नशील असतात. बोनस मिळवून देण्याचा हा निर्णयही त्यांच्या सातत्यपूर्ण आणि प्रामाणिक पाठपुराव्यामुळेच शक्य झाला. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद फुलला आहे.”
शेतकरीहिताच्या कार्यात नेहमी अग्रस्थानी राहणारे आमदार मुनगंटीवार यांचे हे प्रयत्न कृषी क्षेत्रातील विकास आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे, असा विश्वास यावेळी शेतकरी बांधवांनी व्यक्त केला.