Breaking

Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवारांच्या मागणीवरून सरकारने घेतला ठोस निर्णय !

Maharashtra government took a concrete decision on the demand of Sudhir Mungantiwar : धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात दुसऱ्या टप्प्यातील बोनस लवकरच जमा होणार

Chandrapur : शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आणि सभागृहात शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांतून यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २०२ कोटी रुपयांची पीक विमा रक्कम आणि बोनस मिळाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे शेतकऱ्यांनी धान विक्री केली नसली तरीही नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार आहे.

आमदार मुनगंटीवार यांनी सातत्याने लाऊन धरलेल्या मागणीवर हा ठोस निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे केवळ चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. खरीप हंगाम २०२४-२५ अंतर्गत किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेत सहभागी झालेल्या नोंदणीकृत शेतकऱ्यांना प्रती हेक्टर २० हजार रुपयांचा बोनस मिळावा, अशी मागणी आमदार मुनगंटीवार यांनी विधानसभेत लाऊन धरली होती. ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर शासनाने निर्णय घेतला आणि अन्न व नागरी पुरवठा विभागाने २५ मार्च रोजी अधिकृत शासन निर्णय जाहीर केला होता.

Chhagan Bhujbal : भुजबळांचे भाकीत, राज-उद्धव युती मुंबई बाहेर अशक्य!

मुनगंटीवार यांच्या संवेदनशील नेतृत्वाची सातत्यपूर्ण फलश्रुती शेतकऱ्यांसाठी हितकारी ठरली आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात दुसऱ्या टप्प्यातील बोनस रक्कम लवकरच जमा होणार आहे. यापूर्वी शासनाकडून प्राप्त झालेली पहिल्या टप्प्यातील ६९ कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. आता १३४ कोटी २ लाख ५४ हजार ६३६ रुपयांची रक्कम चंद्रपूर जिल्ह्याच्या पणन अधिकारी विभागाकडे जमा झाली आहे. ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे.

dance bar issue : सगळीकडेच हिडीसफिडीस प्रकार घडत नाहीत

शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच बोनस जमा होणार असून, या निर्णयाबद्दल चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे विशेष आभार मानले आहेत.