Breaking

Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने शेतकऱ्यांना कोट्यवधींची मदत

 

Mahayuti government announced help to farmers affected by heavy rains : अतिवृष्टीग्रस्तांना मोठा दिलासा;
मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश

Chandrapur चंद्रपूर जिल्ह्यातील
हजारो शेतकऱ्यांना गेल्यावर्षी अतिवृष्टीचा व पुराचा फटका बसला होता. त्यामुळे शेतजमिनींचे व शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले होते. पण त्याचसोबत या शेतकऱ्यांना सरकारकडून मदत जाहीर व्हावी. यासाठी देखील त्यांनी पाठपुरावा केला होता. राज्य सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील 5385 शेतकऱ्यांना 7 कोटी 65 लक्ष 33 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचेच हे यश मानले जात आहेत.

शासनाकडे जून ते सप्टेंबर, 2024 या कालावधीत अतिवृष्टीमुळे शेतजमीनीच्या झालेल्या नुकसानीसाठी प्रस्ताव आले होते. त्यानंतर आता राज्य सरकारने यावर निर्णय घेत राज्यभरासाठी 2925.61 लक्ष रुपयांचा निधी वितरीत करण्याला मंजुरी दिली आहे. या प्रस्तावांमध्ये चंद्रपूरच्या शेतकऱ्यांचाही समावेश होता. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करून मदतीचे प्रस्ताव तयार करावे, अशा सूचना मुनगंटीवार यांनी त्या कालावधीत दिल्या होत्या.

Sudhir Mungantiwar : झरपट नदीचे पुनरुज्जीवन केवळ उपक्रम नाही, तर भविष्यासाठी महत्त्वाचा निर्णय!

 

त्यानंतर प्रशासनाने नागपूर विभागांतर्गत चंद्रपूरचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानुसार जून व जुलै 2024 या कालावधीत अतिवृष्टीचा फटका बसलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील 5309 शेतकऱ्यांना 7 कोटी 48 लक्ष 89 हजार रुपयांची मदत जाहीर झाली आहे. तर ऑगस्ट व सप्टेंबर 2024 या कालावधीत जिल्ह्यातील 76 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला होता. त्यांना 16.4 लक्ष रुपयांची मदत जाहीर झाली आहे.

एकूण 2,254.76 हेक्टर शेतीचे नुकसान या चार महिन्यांच्या कालावधीत झाले होते. त्यानुसार जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील 5385 शेतकऱ्यांना 7 कोटी 65 लक्ष 33 हजार रुपयांची मदत मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे मिळणार आहे.

Sudhir Mungantiwar : बल्लारपूरमध्ये होणार राज्यातील उत्कृष्ट न्यायालयीन इमारत

शेतकऱ्यांनी मानले आभार
मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची विक्रमी 202 कोटीची रक्कम मिळू शकली होती. तर शेतकऱ्यांच्या धानाला 20 हजार रुपये हेक्टरी बोनस देऊन भात उत्पादक शेतकऱ्यालाही न्याय देण्याचे काम त्यांनी केले होते. आता त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.