May all the wishes of my beloved sisters be fulfilled : रक्ताच्या नात्यापेक्षा अधिक दृढ अतुट बंध
Chandrapur : राखीचा धागा हा केवळ प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक नाही तर रक्ताच्या नात्यापेक्षा अधिक दृढ असा अतुट बंध आहे. हा दिवस माझ्यासाठी अत्यंत सौभाग्यशाली आहे. शेकडो लाडक्या बहीणींनी राखी बांधून मला आपुलकीचा मान दिला. रक्षा बंधनाचा हा पवित्र उत्सव आहे. लाडक्या बहीणींच्या मनातील प्रत्येक इच्छा व आकांक्षा पूर्ण व्हाव्या, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
बल्लारपूर नाट्यगृहात तालुका भाजपद्वारे आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमात आमदार मुनगंटीवार बोलत होते. यावेळी वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंग चंदेल. भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, शहर अध्यक्ष रणजयसिंग, महिला आघाडी अध्यक्ष वैशाली जोशी, आरती अक्केवार, कांता ढोके, शिवचंद्र द्विवेदी, जयश्री मोहुर्ले, संध्या मिश्रा, रेणुका दुधे, सारिका कणकम, किशोर मोहुर्ले, सतीश कणकम, गुलशन खान, देवेंद्र वाटकर, नजमा खान, उत्तरा सोनटक्के, उन्नती टेकाडे, सुनिता निवलकर, सुरेखा श्रीवास्तव आदी उपस्थित होते.
Sudhir Mungantiwar : स्वातंत्र्य दिन सोहळ्यात लोकतंत्र सेनानींना सन्मानपूर्वक निमंत्रण द्यावे
या राखीने लाडक्या बहिणींचा विश्वास, प्रेम, सुरक्षितता आणि काळजी घेण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे. लाडक्या बहिणींच्या कल्याणासाठी स्व. सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात आली असून, या केंद्रातून प्रशिक्षण घेतलेल्या महिला आत्मनिर्भर होत आकाशात उंच भरारी घेतील. असा विश्वासदेखील आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी लाडक्या बहिणींबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या कल्याणासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याचा संकल्प केला.








