Breaking

Sudhir Mungantiwar : ऑलिम्पिकमध्ये चंद्रपूरला नवी ओळख देण्याचा मुनगंटीवारांचा निर्धार!

MLA Mungantiwar wants to make Chandrapur shine in the Olympics : वीर बाबुराव शेडमाडे स्टेडियमच्या क्रीडा संकुलासाठी १३७ कोटींची प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी उचलले महत्वाचे पाऊल

Mumbai : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याला विकासाच्या शिखरावर नेण्याचा ध्यास घेतला आहे. विकासाचे नवनवे मापदंड त्यांनी निर्माण केले आहे. ऑलिम्पिकमध्ये चंद्रपूर जिल्ह्याला चमकवायचेच, असा निर्धार त्यांनी केलेला आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रासाठी भरीव काम ते करत आहेत. नुकतेच त्यांनी दाताळा येथील वीर बाबुराव शेडमाडे स्टेडियमच्या क्रीडा संकुलासाठी १३७ कोटींची प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी महत्वाचे पाऊल टाकले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील दाताळा येथील वीर बाबुराव शेडमाडे स्टेडियमच्या अत्याधुनिक क्रीडा संकुलाच्या बांधकामासाठी १३७ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यासंदर्भात आमदार मुनगंटीवार यांच्या मागणीला क्रीडामंत्री दत्तामामा भरणे यांनी बैठकीत सकारात्मक प्रतिसाद दिला. मंजुरीसाठी त्यांनी आश्वस्त केले. दाताळा येथे होणारे संकुल क्रीडा क्षेत्रातील खेळाडुंना प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास यावेळी आमदार मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

Collector of Yavatmal on March Ending: जिल्ह्याला मिळालेला एकही रुपया शिल्लक ठेवू नका!

दत्तामामा भरणे यांच्या अध्यक्षतेखाली काल (१९ मार्च) मंत्रालयात विशेष बैठक पार पडली. यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांची प्रमूख उपस्थिती होती. यावेळी अप्पर मुख्य सचिव दिग्गीकर, क्रीडा आयुक्त सोनावणे, सहसंचालक सुधीर मोरे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश फुंड, संजय सबनीस, शेखर पाटील क्रीडा विभागातील अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत प्रस्तावित दाताळा येथील वीर बाबुराव शेडमाके स्टेडियमच्या क्रीडा संकुलाच्या संपूर्ण आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. अत्याधुनिक क्रीडा सुविधांसह हे संकुल जिल्ह्यातील युवा खेळाडूंसाठी एक प्रेरणादायी केंद्र ठरेल. चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडू या संकुलाच्या माध्यमातून ऑलिम्पिकसह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करू शकतील, असा असा विश्वास बैठकीत राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीला बैठकीदरम्यान क्रीडामंत्री दत्तामामा भरणे यांनी सकारात्मकता दाखवत दाताळा येथील वीर बाबुराव शेडमाडे स्टेडियमच्या क्रीडा संकुलाला प्रशासकीय मान्यता लवकरच दिली जाईल, असे आश्वासन दिले. क्रीडा क्षेत्राचा विकास हा राज्य सरकारच्या प्राथमिक उद्दिष्टांपैकी एक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

स्थानिक खेळाडूंना नवी संधी..
चंद्रपूर जिल्ह्यातील दाताळा येथे प्रस्तावित क्रीडा संकुलामुळे स्थानिक तसेच जिल्ह्यातील खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. येथे अॅथलेटिक्स, फुटबॉल, हॉकी, कुस्ती, कबड्डी आणि विविध ऑलिम्पिक खेळांसाठी आवश्यक तांत्रिक व भौतिक सुविधा विकसित केल्या जाणार आहेत.

Mahatma Gandhi Employment Guarantee Scheme : डीएड-बीएड केले, पण मजुरीवर गेले!

राज्य सरकारच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील युवा खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी मिळणार आहे. भविष्यातील ऑलिम्पियन आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडवण्यासाठी हे संकुल अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. या निर्णयामुळे क्रीडाप्रेमीमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला असून, चंद्रपूर जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला नवी उभारी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.