MLA Sudhir Mungantiwar cast his vote with his family : आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सहपरिवार केले मतदान
Chandrapur: चंद्रपूर महापालिकेसाठी तब्बल आठ वर्षांनंतर होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आज आपल्या परिवारासह मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मतदानाचे महत्त्व अधोरेखित करत लोकशाहीतील नागरिकांच्या जबाबदारीवर भर दिला.
आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, मतदानाचा अधिकार मिळाल्यापासून मी नियमितपणे मतदान करत आलो आहे. मतदान करणे हे केवळ हक्क नसून माझे आणि आपले सर्वांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. मी आणि माझी धर्मपत्नी आम्ही दोघांनीही आज आमचे राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण केले आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये मतदान करणे ही प्रत्येक नागरिकाची आवश्यकता आणि दायित्व आहे. शेवटी मतदानाच्या माध्यमातूनच विकासासाठी योग्य निर्णय घेतला जातो. हे शहर आमचे, तुमचे, सर्वांचे आहे आणि चंद्रपूर शहर महाराष्ट्रात वेगाने पुढे जावे, हीच इच्छा आहे. जनता निश्चितच अतिशय विचारपूर्वक आणि योग्य निर्णय घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Municipal Election : अकोल्यात बुरखाधारी महिलांची ओळख न पटवता थेट मतदान केंद्रात प्रवेश
दरम्यान, चंद्रपूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी ८ वाजेपासून मतदानास सुरुवात झाली आहे. सकाळी ७.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत शहरात एकूण २६.२६ टक्के मतदान झाल्याची अधिकृत आकडेवारी निवडणूक प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. दुपारनंतर मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या १७ प्रभागांमध्ये सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेत दुपारी १.३० वाजेपर्यंत एकूण ७८ हजार ७७५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. शहरातील एकूण मतदारसंख्या २ लाख ९९ हजार ९९४ असून, त्यापैकी ४२ हजार ७५० पुरुष, ३६ हजार २३ महिला आणि २ इतर मतदारांनी मतदान केले आहे.
Municipal Election : मतदारांनो सावधान, शाई पुसल्यास तुमच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो !
प्रभागनिहाय आकडेवारीनुसार काही प्रभागांमध्ये मतदानाचा टक्का तुलनेने अधिक आहे. प्रभाग क्रमांक १४ भिवापूर येथे सर्वाधिक ३१.०२ टक्के मतदान नोंदवण्यात आले आहे. त्याखालोखाल प्रभाग क्रमांक १७ डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभाग येथे २८.८३ टक्के, तर प्रभाग क्रमांक ४ बंगाली कॅम्प येथे २८.४१ टक्के मतदान झाले आहे.
Thane municipal corporation election: लंडन से आया मेरा व्होटर, व्होटर को सलाम करो
दरम्यान, प्रभाग क्रमांक ७ जटपुरा येथे सर्वात कमी २३.४७ टक्के, तर प्रभाग क्रमांक ५ विवेक नगर येथे २३.८१ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. उर्वरित बहुतांश प्रभागांमध्ये मतदानाचा टक्का २५ ते २७ टक्क्यांच्या दरम्यान आहे.
निवडणूक प्रशासनाच्या माहितीनुसार सायंकाळच्या सत्रात मतदानाचा वेग वाढण्याची शक्यता असून, मतदारांचा प्रतिसाद आणखी वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील सर्व मतदान केंद्रांवर शांततेत मतदान प्रक्रिया सुरू असून, कोणतीही अनुचित घटना घडलेली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
__








