MLA Sudhir Mungantiwar clears confusion about houses on forest land in Ballarpur Dist. Chandrapur : लोकांच्या हिताचे रक्षण ही माझी नैतिक जबाबदारी
Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्रारपूर येथील वनजमिनीवर असलेल्या घरांबाबत काही असामाजिक तत्व अफवा पसरवत होते. स्थानिक नागरिकांनी यासंदर्भात राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांना माहिती दिली. त्यांनी हा विषय स्पष्ट करण्यासाठी लगेच बल्लारपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात संबंधितांसोबत बैठक घेतली आणि हा विषय स्पष्ट केला.
बल्लारपूर येथील रविंद्र नगर, मौलाना आजाद वॉर्ड, पंडित दिनदयाल वॉर्ड व डॉ. राजेंद्रप्रसाद वॉर्डात गेल्या ३० ते ४० वर्षांपासून लोक वास्तव्यास आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या नावाखाली या भागातील अतिक्रमण हटवण्यात येणार असल्याच्या अफवा काही लोक हेतुपुरस्सर पसरवत होते. यामध्ये काहीही तथ्य नाही. नागरिकांच्या हिताचे रक्षण करणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे आणि मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये,असे म्हणत आमदार मुनगंटीवार यांनी हा मुद्दा निकाली काढला.
Sudhir Mungantiwar : पोंभुर्णा तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत करा, अन्यथा जनआंदोलन उभारू
यासंदर्भात आमदार मुनगंटीवार म्हणाले, नागरिकांनी एक-एक पै जमा करून घरे बांधली आहेत. एकीकडे शासन बेघरांना घरे देण्याचे काम करत आहे, तर दुसऱ्या बाजुला काही लोक अफवा पसरवून चार वॉर्डांतील रहिवाशांना हटवले जाणार असल्याच्या चुकीच्या बातम्या पेरत आहेत. अनेक नागरिक नझूल, वेकोलि तसे वनविभागाच्या जमिनींवर गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. या नागरिकांना पट्टे देण्यासंदर्भात नियोजन केले जात आहे. आतापर्यंत अशा ४,४४३ प्रॉपर्टीज निवडण्यात आल्या आहेत. पुढील काळात येथील नागरिकांना पट्टे देण्याची प्रक्रिया राबवण्यात येईल. यासंदर्भातील मागणी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडेही करण्यात येणार आहे.
Sudhir Mungantiwar : ‘धन्यवाद सुधीरभाऊ… तुमच्यामुळेचं आमच्या संघर्षाला न्याय मिळाला!
अफवा पसरवणे, नागरिकांमध्ये भीती निर्माण करणे चुकीचे आहे. कुणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आमदार मुनगंटीवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. बैठकीला भाजपचे जेष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, अतिरिक्त जिल्हाधिकारी व्यवहारे, उपविभागीय अधिकारी अजय चरडे, काशीनाथ सिंह, तहसीलदार रेणुका कोकाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, बल्लारपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ आदींची उपस्थिती होती.