MLA Sudhir Mungantiwar provided excellent facilities to the pilgrims : २ कोटी ९० लाखांतून केला झरपट नदीपासून ते मंदिर परिसराचा विकास
Chandrapur : आजपासून चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली ‘यात्रा महोत्सव’ सुरू झाला आहे. हा महोत्वस लाखो भक्तांच्या आस्थेचा महाउत्सव ठरणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे शासनाकडून २ कोटी ९० लक्ष रूपयांचा निधी मंजूर झाला. यातून झरपट नदीपासून ते मंदिर परिसराचा विकास झालेला आहे.
आमदार मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे राज्यभरातून येणाऱ्या यात्रेकरुंना उत्तम व्यवस्था मिळणार आहेत. चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील ऐतिहासिक आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री माता महाकाली मंदिरात दरवर्षी चैत्र महिन्यात भव्य यात्रा भरते. विदर्भातील अष्टक त्रीपिठांपैकी एक असलेल्या या ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्रावर महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश आणि इतर राज्यांतून लाखो भाविक दर्शनासाठी येतात.
Sudhir Mungantiwar : लालपरी ही गरीबांची जीवनदायिनी; सुधीर मुनगंटीवारांनी केले नव्या बसेसचे लोकार्पण
चंद्रपूर जिल्ह्याचे सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचे प्रतीक असलेल्या या यात्रेत लाखो भाविकांना उत्तम सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार मुनगंटीवार यांनी सर्वप्रथम पुढाकार घेतला. त्यासाठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडून निधी मंजूर करून घेतला.
या यात्रेदरम्यान फक्त 15 ते 20 दिवसांत सुमारे 10 लाख भाविक येथे येतात. यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी तात्पुरती निवासव्यवस्था, आरोग्य सुविधा, स्वच्छता, शौचालये, विद्युत रोषणाई, वाहनतळ, सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या सर्व कामांवर आमदार मुनगंटीवार यांनी स्वतः लक्ष दिले आणि सर्व सुविधा करवून घेतल्या.
Sudhir Mungantiwar : भटाळीत घरांना तडे, शेती नष्ट; मुनगंटीवार जिल्हाधिकाऱ्यांसह पोहोचले थेट गावात !
यात्रेच्या पार्श्वभूमीवर पवित्र तीर्थ म्हणून झरपट नदीचे महत्त्व आहे. परंतु नदीची अवस्था चिंताजनक झाली होती. त्यामुळे नदीचे खोलीकरण, सौंदर्यीकरण आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी सर्वप्रथम आमदार मुनगंटीवार सरसावले. नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार नदीचे काम करण्यासाठी त्यांनी संबंधित यंत्रणांना कामी लावले. यात्रेच्या पूर्वी सर्व कामे करवून घेतली.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी मेट्रो प्रवासातून साधला लोकांसोबत संवाद
यात्रेकरूंच्या सोयीसुविधांसाठी स्नानगृह उभारण्यात आले आहेत. त्या ठिकाणी चार ट्युबवेल पंप कार्यान्वित केल्या आहेत. महानगरपालिकेने गेट दुरुस्ती, झरपट नदी परिसरातील कचऱ्याची साफसफाई, गायमुख दुरुस्ती, बंधारा बांधकाम व फवारे बसवले. तसेच अंचलेश्वर मंदिराचेही काम करण्यात आले आहे. ही कामे झाल्यामुळे यावेळी यात्रेकरुंना सुखद अनुभव मिळणार आहे.








