MLA Sudhir Mungantiwar took his wife and experienced the feeling of devotion : स्नानाने मिळाली आध्यात्मिक शांती आणि नवीन ऊर्जा
Prayagraj : उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे महाकुंभ मेळावा सुरू आहे. तब्बल १४४ वर्षांनी यावेळी हा महायोग आला आहे. भारत देशासह विदेशातील भाविक त्रिवेणी संगमावर डुबकी मारण्याचे पुण्य मिळवत आहेत. महाराष्ट्र राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आज (१८ फेब्रुवारी) प्रयागराज येथे सपत्नीक स्नान केले आणि दर्शन घेतले.
आज सपत्निक प्रयागराजच्या गंगा त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करण्याचा योग आला. गंगेच्या तटावर भक्तिभावाने आरती केली आणि त्रिवेणींचा आशीर्वाद घेतला. या स्नानाने मनाला आध्यात्मिक शांती आणि नवीन ऊर्जा मिळाली. त्रिवेणीच्या पाण्यात डुबकी मारताना श्रद्धेची खरी अनुभूती झाली. या पुण्यस्नानामुळे मन शांत झाले आणि भक्तिरसात न्हाल्याचा आनंद मिळाला, अशी भावना आमदार मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली.
Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंसारखा विकासासाठी Passionate नेता बघितला नाही!
स्नान आणि दर्शन झाल्यानंतर आमदार मुनगंटीवार यांनी ‘X’वर भावना व्यक्त केल्या. ते म्हणतात, ‘प्रयागराज महाकुंभात आज पवित्र संगमात पूजा-अर्चनेचा पुण्ययोग लाभला. त्रिवेणीच्या पवित्र, निर्मळ प्रवाहात स्नान करताना मन अपार आनंद व भक्तिभावाने भरून आले, आणि सपत्नीक दर्शन घेताना मन प्रसन्न झाले आणि नवचैतन्याची ऊर्जा प्राप्त झाली. सर्वांचे कल्याण कर अशी प्रार्थना त्रिवेणी मातेकडे केली.’
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मार्गदर्शनात प्रशासनाने उत्तम व्यवस्था केली आहे. सरकारच्या उत्कृष्ट नियोजनामुळे कोट्यवधी लोक पवित्र स्नान आणि दर्शनाचे पुण्य मिळवत आहेत. या दिव्य आणि आध्यात्मिक यात्रेने मन श्रद्धेने भारावून जाते. प्रयागराज ही भक्तीरसाने न्हाऊन निघालेली नगरी आहे. इथला प्रत्येक क्षण आध्यात्मिक ऊर्जेने परिपूर्ण आहे. दर्शनाने आत्मिक शांती मिळाली. या पवित्र स्थळी येऊन नतमस्तक होण्याचे भाग्य लाभले, हे माझ्यासाठी अत्यंत आनंददायी आणि भावनिक क्षण आहेत, मा गंगा,यमुना सरस्वतीच्या कृपेने सर्वांवर सुख, समृद्धी आणि शांती नांदो हीच प्रार्थना केली, असेही आमदार सुधीर मुनगंटीवार भावना व्यक्त करताना म्हणाले.
आमदार मुनगंटीवार यांनी प्रयागराजला जाण्यापूर्वी अयोध्या नगरीत प्रभू श्रीरामचंद्रांचे सपत्नीक दर्शन घेतले. प्रभुंचे दर्शन घेण्याचे परम सौभाग्य लाभले. रामलल्लाच्या दर्शनाने मन भक्तिभावाने भरून आले. मंदिरातील पवित्र वातावरणात सकारात्मक ऊर्जा आणि भक्तीची अनुभूती झाली. प्रभू श्रीरामांचे कृपाशीर्वाद सर्वांवर सदैव राहो ही प्रार्थना केली, असे ते यावेळी म्हणाले.
याच प्रवासात बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या श्री काशी विश्वनाथाचेही आमदार मुनगंटीवार यांनी काल सपत्नीक दर्शन घेतले. बाबा विश्वनाथाच्या कृपेने मन भक्तिमय झाले. या दिव्य अनुभूतीने जीवन अधिक पावन वाटले. भगवान विश्वनाथाचे कृपाशीर्वाद सर्वांवर सदैव राहो, अशी प्रार्थना यावेळी त्यांनी केली.