MLA Sudhir Mungantiwar travelled by metro to reach Prime Minister Narendra Modi’s event venue : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी केला मेट्रोतून प्रवास
Nagpur : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपुरात माधव नेत्रालयाच्या नवीन प्रकल्पाचे भूमिपूजन पार पडले. पंतप्रधानांच्या आगमनामुळे नागपुरात अभूतपूर्व अशी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. एसपीजी (Special Protection Group) व्यतिरिक्त पाच हजार पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. याशिवाय विशेष पथकांना पाचारण करण्यात आले होते.
शहराच्या रस्त्यांवरील कोंडी टाळण्यासाठी माधव नेत्रालयामध्ये जाणाऱ्या नागरिकांनी मेट्रोचा वापर करावा, असे आवाहन नागपूर मेट्रो व्यवस्थापनाकडून करण्यात आले होते. या आवाहनाला राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. माधव नेत्रालयाचा नवा प्रकल्प हा हिंगणा मार्गावरील मेट्रो वासुदेव नगर स्टेशनच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे मेट्रोने सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत विशेष सेवा सुरू केली होती. एरवी दर १५ मिनीटांनी सुटणारी मेट्रो आज (३० मार्च) या प्रजापती नगर ते लोकमान्य नगर या मार्गावर सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत दर ८ मिनीटांनी सोडण्यात आली.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी गाजवले अर्थसंकल्पीय अधिवेशन !
नागपूर शहरातील रस्त्यांवर आधीच वाहतूक पोलिसांवर प्रचंड ताण आहे. त्यातच आज पंतप्रधान महोदय नागपुरात असल्यामुळे कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात होती. त्यामुळे वाहतूक पोलिसांवर आधीच ताण होता. त्यामुळे माधव नेत्रालयाच्या कार्यक्रमाला जाणाऱ्या नागरिकांनी रस्त्यांवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मेट्रोचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले होते. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आमदार असले तरी त्यांनी मेट्रोच्या आवाहनाला प्रतिसाद देत सामान्य नागरिकाप्रमाणे मेट्रोतून प्रवास केला. येथेही त्यांच्यातील साधेपणा मेट्रोतील प्रवाशांनी अनुभवला. प्रवासादरम्यान त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. ही गोष्ट प्रवाशांना फारच भावली, असे लोकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
Sudhir Mungantiwar : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर लागणार एसआयटी !
मेट्रोच्या प्रवासादरम्यान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नागपुरातील स्वच्छ, गतीमान आणि पायाभूत सुविधांचा अनुभव घेतला. साऊथ अंबाझरी रोडवरील वाहतूक कोंडी टाळत ते थेट माधव नेत्रालयाच्या कार्यक्रमस्थळी आपल्या सहकाऱ्यांसह पोहोचले आणि अगदी वेळेत पोहोचले. हा प्रवास सुखद आणि अतिशय प्रभावी होता, असे आमदार मुनगंटीवार यांनी वासुदेव नगर येथे पोहोचल्यावर माध्यमांशी बोलताना सांगितले. नागपूरचा झपाट्याने होत असलेला विकास, याचा अभिमान वाटतो. मेट्रो केवळ स्थान गाठण्याचं ठिकाण नाही, तर नवभारताच्या विकासाचं प्रतिक आहे. नागपूर मेट्रोमुळे नागपूरकरांचं जिवन सुलभ झालं आहे. दिवसागणिक प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळं मेट्रोने नागपूकरांचे जीवनमान उंचावले असल्याचेही आमदार मुनगंटीवार म्हणाले.