MLA Sudhir Mungantiwar will hold a meeting with Revenue Minister Chandrashekhar Bawankule to resolve the sand problem : आमदार सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही
Chandrapur : घरकुल ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. ग्रामीण व शहरी गरजू कुटुंबांना घराची सोय व्हावी, यासाठी ही योजना राबवली जाते. मात्र, पोंभुर्णा तालुक्यातील अनेक घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध न झाल्यामुळे घराच्या बांधकामात विलंब होत आहे. घरबांधणीसाठी आवश्यक असलेली रेतीची अडचण सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
यासंदर्भात बोलताना आमदार मुनगंटीवार म्हणाले, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन विस्तृत चर्चा करण्यात येईल. चर्चेतून लाभार्थ्यांना अधिक सुलभतेने रेती उपलब्ध करून देण्याचा मार्ग काढू. पोंभूर्णा तालुक्यातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्यासंदर्भात वनविश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीला माजी खासदार अशोक नेते, पोंभुर्णाच्या तहसीलदार रेखा वाणी, पोंभुर्णा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विवेक बेल्लारवार, भाजपा प्रदेश महामंत्री अल्का आत्राम, सुलभा पिपरे, हरिभाऊ ढवस, विनोद देशमुख, राहुल संतोषवार, रोशन ठेंगणे, रवी मरपल्लीवार, राहुल पाल, अजित मंगळगिरीवार, दर्शन गोरंटीवार, ऋषी कोटरंगे, रवी गेडाम, तुळशीराम रोहनकर, बंडु बुरांडे, विस्तार अधिकारी प्रणय गरमडे, उप अभियंता प्रदीप बाराहाते उपस्थित होते.
Sudhir Mungantiwar : गाव, गरीब और किसान, यह भाजप की है पहचान !
आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, अर्ज केल्यानंतर 15 दिवसांच्या आत रेती उपलब्ध करून द्यायचा निर्णय केला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी वेळेत होत नाही. पोंभूर्णा तालुक्यातील 3,528 अपूर्ण घरकुल पूर्ण करण्याकरिता 17 हजार 640 ब्रास रेतीची आवश्यकता आहे. घरकुलांना रेती उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करण्यात आली. काही अंशी रेती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी गाजवले अर्थसंकल्पीय अधिवेशन !
घरकुल लाभार्थ्यांनी छोटे-छोटे घाट आरक्षित करून प्रत्येक गावातील घरकुलांना लागणारी रेती तहसीलदार आणि तलाठी यांच्या निरीक्षणात न्यायची. असा महाराष्ट्रातला पहिला प्रयोग करून आपण घरकुलांना मोफत रेती उपलब्ध करून द्यायची. रेती मिळण्यास येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात येईल. पोंभुर्णा तालुक्यातील रेती आणि घरकुलाच्या प्रश्न मार्गी लावणार असल्याचेही ते म्हणाले.
पोंभुर्णा तालुक्यामध्ये पाणीपुरवठ्याच्या 32 योजना कार्यान्वित आहेत. ज्या गावांमध्ये फ्लोराइड युक्त आणि दूषित पाणी आहे, त्याची माहिती घ्यावी. पाणीटंचाईमध्ये ट्युबवेल, विहिरी, सोलर पंप लावून पाण्याच्या योजना आखण्यात येईल, असेही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.