Mungantiwar aggressive on Aurangzeb’s exaltation : अबू आझमीच्या निलंबनाची मागणी; कबर नष्ट करण्याची भूमिका
Mumbai छत्रपती संभाजी महाराजांचा अमानवी छळ करून त्यांची हत्या करणाऱ्या औरंगजेबचे उदात्तीकरण या राज्यात खपवून घेतले जाणार नाही. औरंगजेबची महाराष्ट्रातील कबर नष्ट केली पाहिजे व औरंग्याचे उदात्तीकरण करणाऱ्या अबु आझमी या आमदाराला तात्काळ निलंबित केले पाहिजे, अशी मागणी राज्याचे माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आज (मंगळवार, दि. ४ मार्च २०२५) विधानसभेत केली.
समाजवादी पार्टीचे आमदार अबु आझमी यांनी औरंगजेबची महानता सांगताना त्याच्या काळात अनेक चांगलेच निर्णय झाले. त्यांच्या काळात उत्तम प्रशासक म्हणून औरंगजेबची ओळख होती, असं म्हटलं आहे. आमदार आझमी यांच्या या विधानांमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. महायुतीचे सदस्य आक्रमक झाले आहेत. आमदार अबु आझमी यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी अनेक सदस्यांनी विधानसभेत केली.
Sudhir Mungantiwar : खेळाडूंनो आपल्या क्षेत्रात पुढे जा, सदैव तुमच्या पाठीशी !
यासंदर्भात विधानसभेत आज सुधीर मुनगंटीवार यांनी आक्रमक भूमिका घेतली. आमदार अबु आझमी यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘हरामखोर याचा अर्थ इंग्रजीत नॉटी Naughty होतो. असा नॉटी असलेला औरंग्या काहींसाठी उत्तम प्रशासक आहे. ज्याने आपल्या बापाला कारागृहात ठेवले व सख्खा भाऊ दारा शुकोहचा खून केला. त्याचे उदात्तीकरण कसे होऊ शकते? या औरंग्याची महाराष्ट्रात असलेली तुटकीफुटकी कबर तोडण्याचा निर्णय आज झाला पाहिजे.’
Sudhir Mungantiwar : आमदार सुधीर मुनगंटीवार जपणार गोंड राजांचा वारसा !
ज्या औरंग्यांने संभाजी महाराजांचा अमानवी छळ केला. ज्याने हिंदूंवर जिझीया कर लावला, ज्याने हिंदू महिलांवर अत्याचार केला. अशा व्यक्तीचे एखादा आमदार आपल्या मतांच्या राजकारणासाठी तुष्टीकरण करीत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही. ‘धर्मचक्र प्रवर्तनाय’ हे विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीमागे लिहिलेले आहे. याच सभागृहात छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र लागलेले आहे. अध्यक्षांनी आता संविधानाचा दांडपट्टा काढण्याची आवश्यकता आहे. अशा विचाराचे या दांडपट्ट्यानी तुकडे तुकडे झाले पाहिजे, असं मुनगंटीवार म्हणाले.
Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने शेतकऱ्यांना कोट्यवधींची मदत
औरंगजेबच्या दरबारात जाऊन दख्खनचा सिंह गर्जला होता. आता पुन्हा या शक्ती डोके वर काढत असतील, तर त्याला लगाम लावण्याची गरज आहे. अशा सदस्याला पहिल्यांदा निलंबित करा. यापुढे औरंग्याचे उदात्तीकरण करण्याची हिंमत कुणी करणार नाही. या सभागृहात केवळ ‘जय शिवाजी व जय भवानी’चा जयघोष होईल, असे सुधीर मुंनगंटीवार यांनी ठणकावून सांगितले.