Sudhir Mungantiwar : मुल जाहिरसभेत मुनगंटीवारांचा काँग्रेसवर हल्लाबोल !

Mungantiwar’s aggressive attack for Kapagate’s victory, rain of slogans : काँग्रेसला संधी म्हणजे संधीची माती; भाजपच देईल विकासाची हमी

Mul – Chandrapur : मुल शहरात राज्याचे माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या जाहिर सभेला सोमवारी सायंकाळी प्रचंड गर्दी उसळली. सुरुवातीपासूनच तीक्ष्ण शब्दबाण सोडत त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. भाजपने काय काम केले, असा प्रश्न काँग्रेसचे नेते विचारतात… पण त्यांना तर धृतराष्ट्रसुद्धा म्हणेल की काँग्रेसवाले माझ्यापेक्षाही आंधळे आहेत, असा हल्लाबोल मुनगंटीवारांनी काँग्रेसवर करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

सभा पुढे रंगताच त्यांनी निवडणुकीच्या संदर्भात पौराणिक उदाहरणे दिली. रावणाचा पराभव रामानेच केला, कंसाचा वध कृष्णानेच केला. त्याचप्रमाणे मुलच्या राजकारणातील विरोधकांचा पराभवही ‘सी फॉर कापगते ताई’करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. किरणताई कापगते यांच्या विजयाला भाजपच्या पुढील मुल विकासयोजनेचे केंद्र मानत त्यांनी पुन्हा एकदा लक्ष वेधले. ज्या प्रभागात भाजप उमेदवार निवडून येईल, तो प्रभाग विकासात नंबर वन राहणार असल्याचा विश्वास मुनगंटीवारांनी मतदारांना दिला.

RTO Department : HSRP साठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; त्यानंतर नो एक्स्टेन्शन, थेट दंड !

सभेतील सर्वाधिक गाजलेली घोषणा म्हणजे ‘कल्याण मंडपम्’. किरण कापगतेंना निवडून द्या, मी पाच कोटी रुपयांचे दोन एकरांत भव्य कल्याण मंडपम् उभारून देईन. कमी खर्चात गरिबांचे लग्न या मंडपातून लावण्याचा मी शब्द देतो.असे त्यांनी जाहीर करताच उपस्थितांनी मोठ्या जल्लोषात प्रतिसाद दिला. “सोमवार ते रविवार… तुमच्या सेवेसाठी उभा आहे सुधीर मुनगंटीवार!”, असे म्हणताच प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटाने आणि घोषणांनी मैदान दणाणून सोडले.

दरम्यान, रिंकू राजगुरूच्या पुढील ‘आशा’ चित्रपटासाठी त्यांनी शुभेच्छा देत,आशा वर्करांच्या जीवनावर आधारित कथा सांगितली आणि समाजकारणाशी निगडित विषय जनतेपुढे आणला.आमच्या विरोधकांकडे सांगायला मुद्दे नाहीत. मंदिरांच्या विरोधात बोलणाऱ्यांना जनता मतरूपी शस्त्राने संपवेल, असा इशारा त्यांनी दिला.

काँग्रेसवर थेट प्रहार करत ते म्हणाले की, “काँग्रेसवाल्यांना संधी देणे म्हणजे संधीची माती करणे. मुलमध्ये भाजपची सत्ता आली नाही, तर पुढील पाच वर्षांत काहीच होणार नाही. केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता आहे, मुल-बल्लारपूर क्षेत्राचा आमदार मी स्वतः आहे त्यामुळे मुल नगरीचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे.

Winter Session of Parliament : हिवाळी अधिवेशनाआधी ‘वर्गणी’चा खेळ ?

इतकेच नाही तर मोबाईल टॉवरची उदाहरणे देत आ.मुनगंटीवार यांनी टोला मारला की, तुमच्या मोबाईलमध्ये काँग्रेसचा सीम टाकला तर तुमचा आवाज सरकारपर्यंत जाणारच नाही. कारण टॉवर इथे भाजपचेच आहेत, असे म्हणत नागरिकांना त्यांनी मुलच्या विकासासाठी जनतेनी भाजपाच्या नगराध्यक्ष आणि प्रभागातील उमेदवारांना विक्रमी मताने निवडणून देण्याचे आवाहन केले.