Sudhir Mungantiwar : शिवरायांच्या किल्ल्यांचा जागतिक सन्मान, मुनगंटीवारांच्या अंगरक्षकाची रायगडावर सायकलवारी!

Mungantiwar’s bodyguard travelled Mumbai to Raigad by cycle : उत्साह अन् आदराचे असेही उदाहरण; मुंबई ते रायगड १७० किमी अंतर एका दिवसात केले पार

Mumbai राज्याचे माजी सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या दूरदृष्टीचा जागतिक परिणाम अलीकडेच महाराष्ट्राने बघितला. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील ११ आणि तामीळनाडूतील एक अशा बारा किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट केले. अख्ख्या महाराष्ट्राला अभिमान वाटला. जगभरातून आनंद व्यक्त झाला. त्याचवेळी मुनगंटीवारांच्या अंगरक्षकाचा उत्साह आणि त्याने व्यक्त केलेला आदर विशेष चर्चेत आहे. या उत्साहात त्याने मुंबईहून थेट रायगडपर्यंत सायकलवारी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याच्या ऐतिहासिक निर्णयानंतर महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण आहे. या ऐतिहासिक निर्णयाचा साक्षात प्रत्यक्ष सन्मान करण्यासाठी मुनगंटीवार यांचे अंगरक्षक पोलीस हवालदार संतोष रघुनाथ चिबडे यांनी थेट मुंबईहून ते रायगड सायकल यात्रा पूर्ण केली.

MLA Sudhir Mungantiwar : आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या ऐतिहासिक प्रस्तावावर जागतिक मोहोर!

मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून ‘मराठा लष्करी भूप्रदेश’ या संकल्पनेला मान्यता मिळाली. या ऐतिहासिक क्षणाचा आनंद व्यक्त करत चिबडे यांनी मुंबईहून रायगडपर्यंत सुमारे १७० किमी अंतर सायकलने केवळ एका दिवसात पार केले. ऐन पावसात आणि कठीण हवामानातही शिवप्रेमाच्या प्रेरणेने ही अविस्मरणीय यात्रा पूर्ण केल्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही संतोष चिबडे यांच्या या धाडसाचे विशेष कौतुक केले आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या वैभवाचा जागतिक स्तरावर झालेला गौरव आणि त्याला आपल्या अंगरक्षकाने सायकल यात्रेद्वारे दिलेली मानवंदना हा अभिमानाचा क्षण आहे,’ असे मत आमदार मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांची मागणी अन् मुख्यमंत्र्यांनी दिल्या बल्लारशाह जीआरपी पोलिस स्टेशन निर्माण करण्याच्या सुचना !

युनेस्कोच्या यादीत रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि तमिळनाडूतील जिंजी या १२ किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे.

शिवरायांच्या स्वराज्य विचारांना जागतिक स्तरावर स्थान मिळवून देणाऱ्या या ऐतिहासिक घडीला आमदार मुनगंटीवार यांचे योगदान वाखाणण्याजोगे असून, त्यांच्या नेतृत्वातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक गौरवात लक्षणीय भर पडल्याचे सर्वत्र म्हटले जात आहे.