Sudhir Mungantiwar : बॅरिस्टर खोबरागडेंच्या गौरवग्रंथासाठी मुनगंटीवारांचा पुढाकार, नार्वेकरांचा सकारात्मक प्रतिसाद !

Mungantiwar’s initiative for Barrister Khobragade’s Gauravgranth, positive response from Norwegians : खोबरागडे परिवार आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी महोत्सव समितीने केली होती मागणी

Chandrapur : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि राज्यसभेचे माजी उपसभापती बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित गौरवग्रंथ प्रकाशित करण्याची मागणी मोठ्या उत्साहाने पुढे आली आहे. या महत्वपूर्ण उपक्रमाला राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी ठोस पाठिंबा देत पुढाकार घेतला आहे.

खोबरागडे परिवार बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे जन्मशताब्दी महोत्सव समितीच्यावतीने आमदार मुनगंटीवार यांच्याकडे हा गौरवग्रंथ काढण्याची मागणी करण्यात आली होती. या ग्रंथात त्यांच्या संसदीय कार्याचा ठसा, सामाजिक योगदान, विचार, भाषणे आणि व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडले जाणार आहेत. समाजासाठी कार्य करणाऱ्या या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यसाठी हा ग्रंथ दिपस्तंभ ठरेल, असा विश्वास आमदार मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

Fadanvis VS Fadanvis : शोभाताई पुन्हा अॅक्टीव, मुख्यमंत्री फडणवीसांच्या घरातूनच सरकारच्या धोरणावर गोळीबार !

खोबरागडे कुटुंबीय आणि जन्मशताब्दी महोत्सव समितीच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी २९ ऑक्टोबर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. त्यांनी या भेटीत बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जीवन गौरवग्रंथाच्या प्रकाशनासाठी निवेदन सादर केले. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि आमदार मुनगंटीवार यांना सकारात्मक प्रतिसाद दिला.

Farmers’ ‘Prahar’ movement : हायवे जाम, नागरिकांचे हाल अन् आता घेतली सरकारने आंदोलनाची दखल !

यापूर्वी सुधीर मुनगंटीवार यांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे टपाल तिकीट काढण्यासाठी आणि त्याच्या प्रकाशनासाठीही पुढाकार घेतला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळेच हे तिकीट प्रकाशित झाले. विशेष उल्लेखनीय म्हणजे या तिकीटाचे प्रकाशनही आमदार मुनगंटीवार यांच्याच हस्ते झाले होते. सामाजिक आणि राजकीय कार्यात नेहमीच प्रेरणादायी भूमिका निभावणारे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा आपली संवेदनशीलता आणि समाजनिष्ठ वृत्ती सिद्ध केली आहे. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या गौरवग्रंथाच्या प्रकाशनामुळे त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा अधिक बळकट होणार आहे. हा प्रयत्न समाजाच्या इतिहासात स्मरणीय ठरेल, असा विश्वास आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.