Sudhir Mungantiwar : अपघातात जीव गमावणाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी मुनगंटीवार सरसावले!

Need for measures to prevent road accidents : अपघातांना रोखण्यासाठी उपाययोजना आवश्यक, परिवहन मंत्र्यांचे आश्वासन

Mumbai महाराष्ट्रात लाखो कोटी रुपयांचे गुळगुळीत रस्ते तयार केले. अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वीत केली. तरीही अपघातांचे प्रमाण कमी होण्याचे नाव घेत नाहीये. राज्यातील वाढते अपघात हा विषय आज (दि. ११ मार्च) सभागृहात चांगलाच तापला. प्रश्नोत्तराच्या तासात सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही बाकांवरील सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेतला.

राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अपघातात जीव गमावणाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत वाढविण्याची मागणी केली. त्यावर मंत्री महोदयांनी सध्या दहा लाख रुपयांची मदत देत आहोत, अशी माहिती दिली. त्याचवेळी वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी उपाययोजना आवश्यक असल्याचेही मुनगंटीवार म्हणाले.

Ajit Pawar on Mungantiwar’s question : भ्रष्ट अधिकाऱ्यांना सुतासारखे सरळ करणार!

देशात सर्वाधिक अपघात महाराष्ट्रात होतात. अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत. दिव्यांगांची संख्या वाढत आहे, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. ‘यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अपघात कमी व्हावे, यासाठी एक निधी निर्माण केला. कायद्याने हा निधी निर्माण करण्यात आला. या निधीचे ८०० कोटी रुपये परिवहन विभागात जमा झाले. अपघात कमी करण्यासाठी या निधीचा उपयोग होणे अपेक्षीत आहे, असं मुनगंटीवार म्हणाले.

Sudhir Mungantiwar : सर्व घटकांना सामावून घेणारा लोकाभिमुख अर्थसंकल्प  

त्यावर ज्या कामासाठी निधी दिला, तो त्याच कामात वापरण्यात येईल, असा शब्द परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला. मुनगंटीवार म्हणाले, ‘राज्यातील एकुण अपघातांपैकी ७० टक्के अपघात दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे होतात. पण पंचनाम्यांमध्ये चालक दारू पिऊन आहे, असे दाखवले तर विम्याची रक्कम मिळत नाही. त्यामुळे पोलिस तसे दाखवत नाही. मागच्या वर्षीच दारूच्या विक्रीतून ३० हजार ५०० कोटी रुपयांचे उत्पन्न राज्याला झाले. यातून जखमी आणि मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना मदत दिली पाहिजे.’

Sudhir Mungantiwar : दाताळ्याच्या संकुलातून आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार चंद्रपूर जिल्ह्याचा नावलौकिक !

मृत्यूमुखी पडलेल्यांना २५ लाख रुपये देण्याची मागणी मुनगंटीवार यांनी केली. पण सध्या १० लाख रुपयांची मदत सरकारकडून करण्यात येते, असे सरनाईक यांनी सांगितले.