Sudhir Mungantiwar : मुनगंटीवार – फडणवीस भेटीची होणार फलश्रुती !

Outcome Expected from Mungantiwar–Fadnavis Meeting : सामाजिक न्याय, सुरक्षा, आरोग्य, नक्षल आणि स्मारक उभारणीसंदर्भात महत्वपूर्ण चर्चा

Nagpur : सतत विकासकामांचा ध्यास धेतलेले नेते म्हणजे सुधीर मुनगंटीवार. ते कोणत्याही खात्याचे मंत्री असो, ते खाते त्यांनी नावारुपास आणले आहे. आजही आमदार म्हणून विकास कामे खेचून आणण्यात ते कुठलीही कसर बाकी ठेवताना दिसत नाहीत. नुकतीच त्यांनी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी सामाजिक न्याय, सुरक्षा, शेतकरी, आरोग्य, नक्षल आणि स्मारक उभारणीसंदर्भात आवश्यक कामे करण्याचा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे धरला.

चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यातील विविध महत्वपूर्ण विषयांवर मुनगंटीवार आणि मु्ख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाली. आमदार मुनगंटीवार यांनी मागण्यांचे सविस्तर निवेदन यावेळी सादर केले. राज्यातील महत्वाच्या विषयांसोबतच बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील विकासकामे, वीज वितरण केंद्रे, शेतकऱ्यांचे प्रश्न, अपघातग्रस्तांना मदत आदी विषयसुद्धा त्यांना लाऊन धरले. निवेदनात आमदार मुनगंटीवार यांनी कृषीपंपाचा विषय मांडला. राज्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपांच्या वीज जोडणीमध्ये झालेल्या त्रुटींमुळे नुकनान भरपाई देण्याची आणि कंपनीच्या कारभाराच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली.

Sudhir Mingantiwar : सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात महामंत्री व आघाडी अध्यक्ष घोषीत !

शेतकऱ्यांना रब्बी हंगाम २०२४-२५ मधील धानाचे पैसे तातडीने अदा करावे, सफाई कामागरांच्या वारसदारांना नगरपरिषद व महानगरपालिकांच्या सेवेत सामावून घ्यावे, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक वीररत्न जिवाजी महाला यांचा पू्र्णाकृती पुतळा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे बसवण्यात यावा, आदी मागण्याही आमदार मुनगंटीवार यांनी केल्या.

चंद्रपूर जिल्ह्यातील नक्षलग्रस्त म्हणून वगळण्यात आलेले नऊ तालुके पुन्हा नक्षलग्रस्त म्हणून घोषीत करावे, अशी मागणी आमदार मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. सार्वजनिक आरोग्य विभागातील प्रबंबित देयके त्वरित अदा करण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भातही निवेदन दिले. सोबतच बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील मुल येथील पॉलिटेक्निक कॉलेज व कृषी महाविद्यालयासंदर्भातील महत्वपूर्व मुद्द्यांचा निवेदनात समावेश करण्यात आला आहे.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवार म्हणाले, उद्योगांच्या मागणीनुसार कुशल मनुष्यबळ तयार करा !

मुल शहर व मुल ग्रामीण शाखा कार्यालयाचे विभाजन करून राजोली येथे नवीन वीज वितरण केंद्र स्थापन करण्याची मागणी तसेच पोंभुर्णा शाखा कार्यालयाचे विभाजन करून नवेगाव मोरे येथे नवीन वीज वितरण केंद्र निर्माण करण्याचा प्रस्ताव आमदार मुनगंटीवार यांनी निवेदनाच्या माध्यमातून दिला.

Sudhir Mungantiwar : चंद्रपूरच्या रस्ते अन् उड्डाणपूलांसाठी मुनगंटीवारांची आग्रही मागणी

बल्लारशाह रेल्वे पोलीस दुरक्षेत्राचे श्रेणीवाढ करून स्वतंत्र रेल्वे पोलीस ठाण्यात रूपांतर करण्याची विनंती त्यांनी केली. अपघातात मृत पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लक्ष रुपयांची मदत मंजूर करण्याची मागणी करण्यात आली असून, त्यामध्ये पोंभूर्णा तालुक्यातील मौजा भटाळी येथील रंजीता तोडासे, ईश्वर कुसराम, शुल्का आलाम व प्रकाशनगर महाकाली कॉलनी (चंद्रपूर) येथील सुजेन सय्यद (वय ४) या मृतकांच्या कुटुंबीयांना ५ लक्ष रुपयाची मदत मंजूर करण्याची मागणी करण्यात आली.