Breaking

Sudhir Mungantiwar : अपघातग्रस्तांसाठी देवदूत ठरले मुनगंटीवारांचे जनसंपर्क वाहन

Public relations vehicle rushed to the aid of accident victims : महादवाडी गावानजीक भीषण अपघात, जखमींना पोहोचवले रुग्णालयात

Chandrapur मुल तालुक्यातील गडीसुर्ला येथून जनसंपर्क आटोपून आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे जनसंपर्क वाहन चंद्रपूरकडे परत येत असताना महादवाडी गावाजवळ बस, ट्रक व चारचाकी वाहन यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात 15 ते 20 नागरिक गंभीर जखमी झाले. आमदार मुनगंटीवार यांच्या वाहनाने लगेच जखमींना मदत केल्यामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.

काही जखमींना मुल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर गंभीर अवस्थेतील जखमींना आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या जनसंपर्क वाहनातून चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मुनगंटीवार यांचे जनसंपर्क वाहन रुग्णांसाठी देवदूत ठरले आहे.

Question raised in the Assembly Hall : महाराष्ट्र हा बोगस बियाणांचा अड्डा !

अपघाताची माहिती मिळताच सुधीर मुनगंटीवार यांनी तात्काळ सिव्हिल सर्जन यांच्याशी संपर्क साधला. जखमींना त्वरित आणि आवश्यक उपचार सुरू करण्याच्या सुचना दिल्या. मुनगंटीवार यांचे स्वीय सहाय्यक कुशल मेघावत यांनी घटनास्थळी तत्परतेने मदत करत जखमींना वेळेत रुग्णालयात पोहोचविण्यास मदत केली. सुदैवाने या अपघातात कोणतेही जीवितहानी झाली नाही.