Ramdas Athawale Pledges Full Support to Sudhir Mungantiwar : बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त टपाल तिकीट काढणार
Mumbai : राजकारण आणि समाजकारण करताना चौफेर लक्ष असणारे नेते विरळेच. असेच एक लोकप्रिय नेते म्हणजे राज्याचे माजी सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार. समाजहिताची कुठलीही बाब त्यांच्या नजरेतून सुटत नाही. येत्या २५ तारखेला बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांची जन्मशताब्दी आहे. यानिमित्त एक टपाल तिकीट काढले पाहिजे, असे आमदार मुनगंटीवार यांना वाटले. त्यांनी तसा प्रस्ताव सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडे मांडला आणि त्यांनी या प्रस्तावाला तात्काळ मंजुरीही दिली.
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने टपाल तिकीट काढण्याच्या दिलेल्या प्रस्तावावर तात्काळ कार्यवाही सुरू करण्याचे आदेश संबंधितांना दिले. आता येत्या २५ सप्टेंबरला हे टपाल तिकीट प्रकाशित होणार असल्याची माहिती आहे. या माध्यमातून बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे. या पुढाकारासाठी बॅरिस्टर खोब्रागडे यांचे अनुयायी आणि सामान्य जनतेतून आमदार मुनगंटीवार यांचे कौतुक केले जात आहे.
Sudhir Mungantiwar : कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित मानधन द्या !
बॅरिस्टर खोब्रागडे यांचे टपाल तिकीट काढले जाणार आहे, ही माहिती केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांना सोशल मिडियातून मिळाली. त्यांनी X वर प्रतिक्रिया देत आमदार मुनगंटीवार यांचे आभार मानले. सोबत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचेही आठवलेंनी आभार मानले आहे.
X वर दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये रामदास आठवले म्हणतात, ‘बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी एक टपाल तिकीट काढण्याचा प्रस्ताव सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला आणि आशिष शेलार यांनी सकारात्मकतेने कार्यवाही सुरू करण्याचेही आदेश दिल्याची माहिती समाज माध्यमातून समजली. त्यांची २५ सप्टेंबर रोजी जन्मशताब्दी आपण साजरी करत आहोत. बरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा सामाजिक न्याय आणि समतेच्या लढ्याला उजाळा देणाऱ्या या स्तुत्य उपक्रमासाठी सुधीर मुनगंटीवार यांचे मनःपूर्वक आभार. सुधीरभाऊ, तुम्हाला आरपीआय किंवा माझ्यावतीने आणखी काही सहकार्य लागले तर आम्ही सदैव तयार आहोत,अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.








