Registration deadline for Pradhan Mantri Pik Bima Yojana extended : प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या नोंदणीची मुदत वाढवली
Chandrapur : प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप २०२५साठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत पूर्वी ३१ जुलै होती. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यात मुसळधार पाऊस होता. त्यामुळे आणि काही भागांत नेटवर्कच्या अडचणींमुळे अनेक शेतकऱ्यांना नोंदणी करता आली नव्हती. ही बाब शेतकऱ्याप्रती संवेदनशील असलेले राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या चाणाक्ष नजरेने हेरली आणि ३१ जुलै ही मुदत वाढवून घेण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या सातत्यापूर्ण प्रयत्नांना यश आले. शासनाने ही मुदत आता १४ ऑगस्टपर्यंत वाढवून दिली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात याच योजनेअंतर्गत गेल्या वर्षी सुमारे साडेतीन लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. मात्र यावर्षी जुन्या मुदतीपर्यंत केवळ ४८,५०० शेतकऱ्यांनीच नोंदणी केली होती. ही तफावत फार मोठी असल्याचे आमदार मुनगंटीवार यांच्या लक्षात आले. त्यामुळे नोंदणीची मुदत वाढवण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांकडे केली होती. सरकारकडे पाठपुरावा करून त्यांनी मुदत वाढवून घेतली. मु्ख्यमंत्र्यांकडेदेखील ही मागणी त्यांनी लाऊन धरली होती. शेतकऱ्यांच्या समस्या हेरून त्या सोडवण्याची मुनगंटीवार यांची तत्परता पुन्हा एकदा अधोरेखीत झाली आहे.
Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवारांच्या मागणीवरून सरकारने घेतला ठोस निर्णय !
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2025 साठी अद्याप ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही, त्यांनी लवकरात लवकर जवळच्या सेवा केंद्रावर किंवा अधिकृत ऑनलाईन पोर्टलवर जाऊन नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.