Breaking

Sudhir Mungantiwar : छोट्या व्यावसायिकांना मिळाला मुनगंटीवारांचा आधार!

Small Entrepreneurs get support from Ex-Minister : उन्हापावसात विक्रेत्यांना मिळणार दिलासा

Chandrapur : रस्त्यांवर फिरून किंवा रस्त्याच्या कडेला छोटे व्यवसाय करून उदरनिर्वाह चालविणाऱ्या विक्रेत्यांचे हाल शब्दात मांडता येणार नाहीत. प्रखर ऊन, सोसाट्याचा वारा, धोधो पाऊस अश्या प्रतिकूल हवामानाची तमा न बाळगता ते दिवसागणिक चार पैसे कमावण्यासाठी अथक परीश्रम घेत असतात. त्यांच्या संघर्षाचे दृश्य रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रत्येकाला दिसते, पण दुर्दैव असे की, अशा संकटग्रस्त विक्रेत्यांच्या मदतीस कुणीही पुढे येत नाही. मात्र, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार त्याला अपवाद ठरले.

वारा, वादळ सुटल्यास विक्रीसाठी लावलेले साहित्य इतरत्र विखुरले जाते. नुकसानही सोसावे लागते. तरीही हे लोक नेटाने आपला व्यवसाय करतात आणि आपल्या मुलाबाळांसाठी राब राब राबतात. उन्हापावसात या छोट्या व्यावसायिकांना दिलासा मिळावा, हा विचार राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुगंटीवार यांच्या मनात आला. त्यांच्यासाठी काय करता येईल, यावर त्यांनी मंथन केले आणि एक कल्पना त्यांच्या डोक्यात आली अन् त्यांनी ती लगेच प्रत्यक्षात उतरवली.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचा पुढाकार अन् चंद्रपूर होणार Honey Hub!

रस्त्यांवर लहान – मोठा व्यवसाय करणाऱ्यांना आमदार मुनगंटीवार यांच्याकडून प्रत्येकी एक छत्री देण्यात आली आहे. या छत्रीमुळे त्यांचे उन्ह आणि पावसापासून संरक्षण होणार आहे आणि सायंकाळी अंधार पडल्यावर ही छत्री त्यांना प्रकाशही देणार आहे. कारण या छत्रीसोबत एक सोलरचा बल्ब देण्यात आला आहे. दिवसभर सूर्याच्या ऊर्जेने हा बल्ब चार्ज होईल आणि रात्री विक्रेत्यांना प्रकाश देईल. ही कल्पना केवळ आणि केवळ सुधीर मुनगंटीवार यांच्याच डोक्यात येऊ शकते, अशी भावना बल्लारपूर विधनसभेतील छत्री प्राप्त झालेल्या विक्रेत्यांनी व्यक्त केली.