Sudhir Mungantiwar fulfilled his promise again : ४८ तासांच्या आत घेतली बैठक, अरविंदोला दिले स्पष्ठ निर्देश
Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यातील अरबिंदो अॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा, ली. कंपीनीच्या टाकळी, जेना, बेलोरा या कोळसा खाणींतील एसआयएस सिक्युरीटी कंपनीच्या अन्यायाविरोधात माजी सैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते मनोज ठेंगणे यांनी आमरण उपोषण केले होते. या उपोषणाला माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी भेट दिली होती. मागण्या पूर्ण केल्या जातील, असे ठोस आश्वासन देऊन आमदार मुनगंटीवार यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती ठेंगणे यांनe केली होती. विनंतीचा मान ठेऊन ठेंगणे यांनी उपोषण मागे घेतले होते. आज आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मनोज ठेंगणे यांच्यासाठी ‘आभाळ ठेंगणे’ करून दाखवले.
‘दिला शब्द केला पूर्ण..’, हे ब्रीद जोपासणाऱ्या आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे ४८ तासांच्या आत तात्काळ विशेष आढावा बैठक भद्रावती तहसील कार्यालयात घेतली. या बैठकीत रोजगार, पिण्याचे पाणी, पर्यावरण संरक्षण आणि नोकरीत स्थानिकांना प्राधान्य, या विषयांवर चर्चा घडवून आणली. यावेळी संबंधित कंपन्यांना आमदार मुनगंटीवार यांनी स्पष्ट निर्देश दिले.
बैठकीला आमदार करण देवतळे,माजी जिल्हाध्यक्ष महानगराचे राहुल पावडे, माजी सैनिक व सामाजिक कार्यकर्ते मनोज ठेंगणे, तहसीलदार भांडारकर, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) अतुल जटाळे, गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ, प्रवीण ठेंगणे, सरपंच प्रभा बोढाले, प्रदीप महाकुलकर, पोलीस पाटील हेमंत धानोरकर, उपसरपंच हरिश्चंद्र आसुटकर, श्रीकृष्ण आगलावे, तनूज पंडिले, सुरेश देहारकर, मनोज मत्ते, प्रज्वलंत कडू, सुरज पेद्दूलवार, नम्रता ठेमस्कर उपस्थित होते.
Sudhir Mungantiwar : 66 वर्षांच्या तुलनेत 11 वर्षांत 5 पट अर्थसंकल्पीय वाढ
बैठकीत आमदार मुनगंटीवार म्हणाले, बेलोरा येथील आराध्य दैवत असलेल्या भंगाराम मंदिराचे स्थलांतर केवळ पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच करण्यात येईल. त्यामुळे पुनर्वसन पूर्ण होईपर्यंत मंदिर हटवण्यात येणार नाही. कंपनीने प्रकल्पग्रस्त किलोनी, बेलोरा, जेना, पानवडाळा, टाकळी, कानसा आणि डोंगरगाव या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेसाठी १७ जुलैपर्यंत आरओ मशीन बसवण्याची कार्यवाही तात्काळ करावी. अरविंदो कोलमाईन्स कंपनीने पाटबंधारे, सिंचन तसेच पर्यावरण विभागाची कोणतीही परवानगी न घेता बेलोरा नाला बंद केला आहे. तसेच किलोनी, बेलोरा आणि जेना गावांगडे जाणारा रस्ता कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता बंद केला आहे. या प्रकाराची योग्य माहिती घेऊन तात्काळ कार्यवाही करण्याच्या सुचना आमदार मुनगंटीवार यांनी दिल्या.
Sudhir Mungantiwar : छोट्या व्यावसायिकांना मिळाला मुनगंटीवारांचा आधार!
स्थानिकांना प्राधान्य देण्याचे निर्देश..
अरबिंदो कंपनीने तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त केलेल्या कामगारांची माहिती कामगार विभागामार्फत घेण्यात यावी. कंपनीने भूसंपादनासाठी स्वतंत्र कार्यालय स्थापन करावे. अरबिंदो कंपनीमध्ये विशेषतः भद्रावती तालुक्यातील स्थानिक नागरिकांना स्थायी स्वरूपात रोजगाराची संधी देण्यात यावी, तसेच सुरक्षारक्षक पदांसाठी स्थानिक उमेदवारांनाच प्राधान्य देण्यात यावे. माजी सैनिकांना सुरक्षा रक्षक पदासाठी दिलेल्या कंत्राटाचा कालावधी 2026 पर्यंत निश्चित करण्यात आला होता, परंतु कंपनी प्रशासनाने ते कंत्राट रद्द केले आहे. त्यामुळे सदर कंत्राट येत्या 26 मेपर्यंत पुन्हा पूर्ववत देण्यात यावे, असे निर्देश आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी कंपनी प्रशासनाला दिले. उपोषणकर्ते मनोज ठेंगणे यांच्या मागण्या पूर्ण होणार असल्यामुळे आनंद व्यक्त केला जात आहे.