Sudhir Mungantiwar : लालपरी ही गरीबांची जीवनदायिनी; सुधीर मुनगंटीवारांनी केले नव्या बसेसचे लोकार्पण

Sudhir Mungantiwar inaugurated the new buses : परीवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा लवकरच

Chandrapur : वित्तमंत्री असताना एस.टी. महामंडळाला जास्त निधी दिला होता. याचं साधं कारण होतं की, श्रीमंत माणूस कारने फिरू शकतो. पण गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी एस.टी. हे प्रवासाचं महत्वाचं माध्यम आहे. गरीब लोकांच्या सुखदुःखामध्ये जर कुणी साथ दिली असेल, तर ती एस.टी. महामंडळाने दिली आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

चंद्रपूर बसस्थानक येथे आमदार मुनगंटीवार यांच्या हस्ते आज (३ एप्रिल) सकाळी बसेसचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, चंद्रपूर हा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरचा जिल्हा आहे. एस.टी. बस गरीब व मध्यमवर्गीयांच्या प्रवासाचं महत्वाचं साधन आहे. त्यासाठी आज नवीन ५ बसेसचे लोकार्पण करण्यात आले. यापूर्वी आपण चंद्रपूर, बल्लारपूर, मूल येथील बसस्थानकांचे नुतणीकरण केले. फक्त चंद्रपूर जिल्हाच नव्हे तर राज्यभरातील बसस्थानकांसाठी वित्तमंत्री असताना निधी उपलब्ध करून दिले.

Shambhuraj Desai : महाबळेश्वर महापर्यटन महोत्सवाला राज्यपाल येणार!

यासंदर्भात आमदार मुनगंटीवार म्हणाले की, तत्कालीन परीवहन मंत्र्यांनी निधी मागितलेला नव्हता. तरीही मी ७०० नवीन बसेस घेण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता.कारण लालपरी ही गरीब आणि मध्यमर्गीयांची जिवनदायीनी आहे. याशिवाय कल्याण, डोंबीवली, मुंबई येथील ज्या महिला नोकरी पेशात आहेत. त्यांना तेजस्वीनी या वातानुकुलीत बसेस उपलब्ध करून दिल्या.

Eknath Shinde : मतांसाठी सोयीचे राजकारण करणाऱ्यांचे चेहरे समोर आले !

चंद्रपूर जिल्ह्याला २०० बसेस दिल्या होत्या. त्यांपैकी १०० बसेस आल्याचे मला सांगण्यात आले आहे. उर्वरीत १०० बसेससाठीही प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी परीवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा लवकरच आयोजित केला जाईल. बसेस, वाहक आणि चालकांसाठी सोयी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येईल. याशिवाय मुल शहरात बस डेपो उभारायचा आहे. काही कारणास्तव ते काम मागे पडले. पण आता जागा उपलब्ध झाली आहे. परिवहन मंत्र्यांच्या दौऱ्यात तोही विषय मार्गी लाऊ, असे ते म्हणाले. गरीब व मध्यमवर्गीयांचे हे साधन पुन्हा एकदा उत्तम सेवेमध्ये रूजू होईल, असा विश्वास आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.