Sudhir Mungantiwar resolved the issue of devotees from Nanded : पोलिस प्रशासनाने नकार दिल्यामुळे भाविकांमध्ये होती नाराजी, मुनगंटीवारांनी विषय निकालात काढला
Chandrapur श्रद्धा, परंपरा आणि विश्वास यांची सांगड घालत नांदेडहून दरवर्षी माता महाकाली देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी यंदाही मोठ्या उत्साहात चंद्रपूर गाठले. देवीची सेवा करत काही दिवस येथे मुक्काम करण्याची त्यांची परंपरा आहे. मात्र, यंदा परंपरेनुसार देवी मांडण्यासाठी पलंग टाकण्यास पोलिस प्रशासनाने अचानक नकार दिल्याने भाविकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली. मात्र, या भाविकांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे धाव घेतली आणि काही तासात विषयच निकाली निघाला.
धार्मिक भावना दुखावल्याची भावना मनात घेऊन सुमारे दोन-तीनशे भाविक आज सकाळी बँड-बाजा, पारंपरिक वाद्ये आणि जयघोष करत थेट आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या निवासस्थानासमोर दाखल झाले.आपल्या श्रद्धेचा प्रश्न सोडवण्यासाठी ते ज्या विश्वासाने मुनगंटीवार यांच्याकडे आले, त्यात महिलांपासून वृद्धांपर्यंत तसेच विविध पारंपरिक खेळ सादर करणाऱ्या कलाकारांचाही मोठा सहभाग होता. वातावरणात अस्वस्थता होती, पण त्यामागे होती ती केवळ आपल्या परंपरेबद्दलची आस्था आणि जपलेला विश्वास.
Sudhir Mungantiwar: चंद्रपूरच्या विकासाचा बुलंद आवाज: विधानसभेत मुनगंटीवारांचा ‘परिणामकारक’ लढा
परिस्थितीचे गांभीर्य ओळखत आमदार मुनगंटीवार यांनी तात्काळ जिल्हा पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधला आणि भाविकांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन देवी मांडण्यासाठी पलंग टाकण्यास जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.त्यांच्या या संवेदनशील आणि तत्पर हस्तक्षेपामुळे तणावाचे वातावरण काही क्षणांतच निवळले. समाधान लाभलेल्या भाविकांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलला.
“सुधीर भाऊंचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. भाविकांनी त्यांना मनापासून आशीर्वाद देत, आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ही घटना केवळ एका प्रश्नाच्या निराकरणापुरती मर्यादित न राहता, लोकप्रतिनिधी आणि जनतेतील नात्याची जिवंत जाणीव करून देणारी ठरली.
संकटाच्या क्षणी धावून जाणारा, संवादातून तोडगा काढणारा आणि लोकांच्या श्रद्धेचा मान राखणारा नेता म्हणून आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यावरील विश्वास या निमित्ताने अधिकच दृढ झाला.
सत्तावेध








